महाराष्ट्र

जिल्ह्याचे पोलीस प्रमुख डॉ. बसवराज तेली यांची एस के आय सैनिक स्कूल ला सदिच्छा भेट

सांगली जिल्हा प्रतिनिधी : आनंद सावंत टाईम्स 9 मराठी न्यूज, मो. 8007932121

सांगली दि. 15 रेठरेधरण( ता वाळवा) येथे एस के आय सैनिक स्कूल रेठरेधरण येथे जिल्ह्याचे पोलीस प्रमुख आदरणीय डॉ. बसवराज तेली यांनी सदिच्छा भेट दिली तसेच त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला

यावेळी त्यांना या पदापर्यंत पोचण्यासाठी कोणत्या मार्गाने आणि कश्या प्रकारे अभ्यास केला कोण कोणत्या अडचणी आल्या त्याला सामोरे जावून जिद्दीने अभ्यास असा केला याची संपूर्ण संवाद आणि मनमोकळे पणाने विद्यार्थ्यांशी गप्पा मारल्या त्यामुळे विद्यार्थी आणि त्यांच्या मध्ये खूप संवाद झाला विद्यार्थ्याणी मन मोकळे पणाने त्यांना प्रश्न विचारले आणि त्यांनी ही दिलं खुश गप्पा मारल्या, नक्कीच याचा उपयोग विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यासाठी होईल यात मात्र शंका नाही.

यावेळी उपस्थित इस्लामपूर पोलीस स्टेशनचे पी.आय हरगुडे साहेब, स्कूलचे प्रिन्सिपल रामपाल तिवारी सर, स्कूलचे ड्रिल इन्स्पेक्टर अमृत पाटील सर तसेच शिक्षक स्टाफ यावेळी उपस्थित होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button