आरोग्य

अकलूज येथे मोफत “लठ्ठपणा तपासणी शिबिर” यशस्वी रित्या पार पडले…

विशेष प्रतिनिधी,टाइम्स 9 न्यूज,अकलूज

केमिस्ट हृदयसम्राट जगन्नाथ (आप्पा) शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली,माळशिरस तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन तर्फे,अकलूज येथे “मोफत लठ्ठपणा तपासणी शिबिर”घेण्यात आले…

दीपप्रज्वलनाने शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी AIOCD LTD चे डायरेक्टर व MSCDA चे निमंत्रित सदस्य बसवराज मणूरे व पश्चिम महाराष्ट्र व जिल्हा संघटनेचे खजिनदार प्रशांत खलीपे तसेच डॉ. वंशपायन मेमोरियल मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता
डॉ.संजीव ठाकूर व प्रोफेसर
डॉ.अमेय ठाकूर
(बेरियट्रिक सर्जन),मोहोळ तालुका संघटनेचे सदस्य सचिन शास्त्री तसेच डॉ.संचित खरे व माळशिरस तालुका संघटनेचे अध्यक्ष विठ्ठलराव गायकवाड उपस्थित होते…

प्रास्ताविक विठ्ठलराव गायकवाड यांनी केले,यावेळी बसवराज मणूरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले व
डॉ.संजीव ठाकूर यांनी उपस्थित रुग्णांना बेरियट्रिक सर्जरी व सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथे होणाऱ्या इतर सर्व लॅप्रोस्कॉपिक शस्त्रक्रिया बद्दल माहिती दिली…

सदर शिबिरामध्ये जवळपास 100 रुग्णांची तपासणी करण्यात आली,त्यापैकी ज्या रुग्णांना गरज आहे अशा रुग्णांना छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर,येथे मोफत ऍडमिट होण्याचा व शस्त्रक्रिया करून घेण्याचा सल्ला देण्यात आला…

सदर शिबिर यशस्वी पार पाडण्यासाठी माळशिरस तालुका संघटनेचे विजय जगताप,नितीन दोशी,शुभम चव्हाण,तुषार बेंद्रे आणि सर्व सभासदांनी विशेष प्रयत्न केले…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button