शहर

पश्चिम रेल्वेच्या सफाळे रेल्वे स्टेशनवर खासदार डॉ. हेमंत सवरा यांच्या हस्ते नवीन लिफ्टचे उद्घाटन..

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640

पश्चिम रेल्वेच्या सफाळे रेल्वे स्थानकावर एफओबी दुहेरी दरवाजा असलेल्या लिफ्टचे उद्घाटन पालघर जिल्ह्याचे खासदार डॉक्टर हेमंत विष्णू सवरा यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले.

यावेळी प्रवाशांनी व उपस्थित नागरिकांनी खासदार डॉ. हेमंत विष्णू सवरा यांचा वाढदिवस सफाळे रेल्वे स्थानकात मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा केला.
हा महत्त्वपूर्ण प्रकल्प डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया इंडियन रेल्वे आणि मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आला आहे.

सफाळे रेल्वे स्थानकात नवीन लिफ्ट सुरू झाल्यामुळे प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे.
विशेष करून ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग प्रवासी, शाळकरी लहान विद्यार्थी, मालवाहू भाजी, दूध विक्रेते यांना या लिफ्ट मुले मोठा दिलासा मिळणार आहे.

यावेळी या कार्यक्रमाला माजी राज्यमंत्री मनीषाताई निमकर, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण राऊत, सामाजिक कार्यकर्ते भरत काळे, सिकंदर शेख, व भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते, डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्था, सफाळे स्टेशन कमिटी, सफाळे विकास कृती समिती, सफाळे रेल्वे परिसर व्यापारी समिती, ग्रामपंचायत उंबरपाडा-सफाळे, ग्रामपंचायत कर्दळ , ग्रामपंचायत माकणे तसेच या भागातील प्रवासी वर्ग, ग्रामस्थ आणि रिक्षा चालक-मालक संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button