सफाळे शिलटे पाडा गावात आदिवासी समजोन्नती सेवा संस्थे मार्फत बिरसा मुंडा राघोजी भांगरे यांची संयुक्त जयंती उत्साहात साजरी
टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640.
हजारो वर्षांपासून पृथ्वीवरील जल, जंगल, जमीन यांचे संतुलन आणि मूल्य जपण्याचे काम संस्कृती पूजक आदिवासी समाज करीत आला आहे. विनाशकारी प्रकल्प आणून शासन आदिवासीना बेदखल करीत असून त्याची किंमत शासनाला मोजावी लागणार आहे. असे प्रा. डॉ. नीरज हातेकर यांनी सफाळे शिल्टे गावात शनिवार दिनांक 30 नोव्हेंबर 2024 रोजी आयोजित कायक्रमात बोलताना सांगितले .लाडक्या बहिणींनी अल्प प्रलोभनाला बळी न पडता आपल्या हक्काचे आदिवासी विकास निधी आपल्याला का मिळत नाही याचा हिशोब घेण्यासाठी उभे राहिले पाहिजे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. शासन आदिवासीना बेदखल करीत असून आदिवासी विकास विभागाचा 16 हजार कोटीचा निधी आदिवासी कुटुंबा पर्यंत पोचवला जातं नसल्याची टीका त्यांनी केली. आदिवासी समजोन्नती सेवा संघ आयोजित धरतीआबा बिरसा मुंडा आणि आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या संयुक्त जयंती कार्यक्रमात सफाळे शिलटेपाडा गावात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.
यावेळी ॲडव्होकेट दीपक भाते, डॉ. विलास पोसम, डॉ.नीलम पोसम, साखरे , डॉ. दीपा ठाकूर यासह मान्यवर उपस्थित होते.यावेळी समाज प्रबोधनावर सागर सुतार, दिलीप सुतार, जयवंत परेड, नितीन बोंबाडे, परशूराम शेलार, गणेश बोंबाडे, शेलार बाई यासह अनेकांनी मार्गदर्शन केले. यावेळी विविध आदिवासी क्रांती, संस्कृती गीतांवर सामूहिक नृत्य, तसेच सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. शिलटे, सफाळे, वेढी, माकणे, किरई पाडा, केळवा, कपासे, कांद्रेभूरे, भवानगड, एढवण, मांडे, नगावे, टेंभीखोडावे, पेणंद, येथून मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते. यावेळी महिला आणि तरुणांची लक्षणीय उपस्थिती होती.
आदिवासी समाजोन्नती सेवा संस्थाचे अध्यक्ष सागर सुतार यांनी यापुढेही सामाजिक, सांस्कृतिक चळवळीत आपला सहभाग राहील तसेच आदिवासी समाजाची लढाई साठी अधिक तीव्र करण्याची ईच्छा व्यक्त करून विनाशकारी प्रकल्पविरुद्ध लढा तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला. आदिवासी नेते कै. काळुराम धोदडे यांची आकर्षक रांगोळी प्रा. चित्रगंधा सुतार यांनी काढली होती. तर स्वागत कक्षावर भव्य तारपा प्रतिकृती विशेष आकर्षण ठरली.उपाध्यक्ष आशुतोष बरफ, सचिव संघवी भोपी,खजिनदार किशोर गिराणे, सल्लागार महेंद्र लहांगे, प्रफुल्ल मोहीते, सुशांत शेलार, अरूण काटेला, किशोर धोदडे, अंकुश बालशी, सुरज सालकर, विनोद गोरखना, विशाल कोम, रोहीत भुयाळ, चेतन भोईर, संदेश शेलार, कल्पेश भुयाळ, समिर भुयाळ, सिध्देश तांडेल, सुभाष जाधव, गोपिनाथ गिराणे, निलेश पाडेकर, नितेश दुमाडा, संतोष पाडेकर, मयुर जाधव, राजू काटेला, रोशन तांडेल, चंद्रकांत धोदडे,वैभवी भुतकडे, विलास जाधवयांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. सुत्रसंचलन उदय भुयाळ, आणि शिल्पा म्हसकर यांनी केले. स्वागताध्यक्ष दिप्ती बोंबाडे, राहूल पिठोला म्हणून उपस्थित होते.यावेळी लहान मुलांनी भाषणे सादर केली. आदिवासी समाजातील गुणवंत विद्यार्थांना प्रशस्ती पत्रक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.