माळशिरस तालुक्याचे “जाणते राजे” जयसिंह मोहिते पाटील यांच्या 75 व्या वाढदिवसा निमित्त जिलेबी वाटप…
टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
माळशिरस तालुक्याचे जाणते राजे “किंगमेकर” जयसिंह तथा बाळदादा मोहिते पाटील यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसा निमित्त युवा नेते सयाजीराजे मोहिते पाटील यांच्या हस्ते जिलेबी वाटप करण्यात आली…
जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती बुद्धवासी नामदेवराव गायकवाड यांचे ज्येष्ठ चिरंजीव “भावी नगरसेवक” तसेच राष्ट्रवादी श प गटाच्या सामाजिक न्याय विभागाचे अकलूज शहर अध्यक्ष सिद्धार्थ (गरीबदास) गायकवाड यांनी आयोजित केलेल्या जिलेबी वाटप कार्यक्रमास प्रचंड असा प्रतिसाद मिळाला…
सदरच्या जिलेबी वाटप कार्यक्रमा साठी “भावी नगरसेवक” सिद्धार्थ गायकवाड यांच्या सह सज्जन लोखंडे,बागवान समाजातील “समाज भूषण” आणि “भावी नगरसेवक” भैय्या माढेकर,आकाश गायकवाड,अमोल तोडकर उपस्थित होते…
ह्या कार्यक्रमासाठी अकलूज येथील मोहिते पाटील समर्थकांची उपस्थिती उल्लेखनीय होती,सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आकाश गायकवाड आणि मित्र मंडळींनी विशेष प्रयत्न केले…