शिर्डी येथे अखिलस्तरीय महा-ई-सेवा केंद्र व आधार केंद्र संघटन यांचे राज्यस्तरीय अधिवेशन
प्रतिनिधी…. रियाज मुलाणी
मो 9921500780
रविवार दिनांक 8/ 12 /24 रोजी शिर्डी येथे राज्यातील महा-ई-सेवा केंद्र चालक व आधार केंद्र चालक यांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी या राज्यव्यापी संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. महा-ई-सेवा चालकांचे प्रश्न शासन दरबारी मांडून त्याचा पाठपुरावा करून ते सोडवणे यासाठी संघटना प्रयत्न करणार आहे.
शासनाने जनतेला एका रांगेत उभे न करता जागेवरच सर्व शासकीय प्रमाणपत्र देणे कामी महा-ई-सेवा केंद्र याची निर्मिती केली आहे.ही केंद्रे शासन व जनतेमधील दुवा असून त्यांना अनेक अडचणीला सामोरे जावे लागते व या अडचणी सोडवण्यासाठी एकत्रितपणे लढा उभारणे गरजेचे आहे.त्या अनुषंगाने शिर्डी येथे प्रथम अधिवेशन घेण्याचे योजले आहे. त्यास राज्यातील सर्व महा-ई-सेवा चालक व आधार केंद्र चालक यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य रियाज तांबोळी यांनी केले आहे.