महाराष्ट्र

मैत्री प्रतिष्ठान चे संजय वाघमोडे यांच्यामुळे वेळापूर सुमित्रा नगर अंगणवाडीचा प्रश्न सुटला

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

वेळापूर ग्रामपंचायत हद्दीतील मंजूर अंगणवाड्या इमारतीसाठी तात्काळ जागा द्यावी व इमारती बांधकामासाठी अनुदान प्रस्ताव सादर करावेत अशी सातत्याने मैत्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य माळशिरस तालुकाध्यक्ष संजय वाघमोडे यांनी वेळापूर ग्रामपंचायतीकडे केली होती. अखेर त्यांच्या पाठपुराव्यामुळे त्यांच्या अंगणवाडीच्या बरोबर सर्वच मंजूर अंगणवाड्यांना हक्काची जागा मिळाली. वेळापूर मधील जनतेतून संजय वाघमोडे यांचे भरभरून कौतुक होत आहे.

याप्रकरणी संजय वाघमोडे यांनी मैत्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष महेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दिलेल्या निवेदनात अयोध्या नगर सुमित्रा कॉलनी या अंगणवाडीसाठी निवेदन दिले होते परंतु याबरोबर अन्य अंगणवाडीचाही प्रश्न मार्गी लागला आहे. .वेळापूर ग्रामपंचायतीला या प्रश्नाबाबत संजय वाघमोडे यांनी पाठपुरावा केल्याने सरपंच रजनीश बनसोडे, ग्रामविकास अधिकारी के. बी. सुरवसे यांनी अंगणवाडीच्या जागेच्या प्रश्नाबाबत संजय वाघमोडे यांना याबाबत पत्र दिले.

पत्रात वेळापूर ग्रामपंचायतीने अंगणवाडीसाठी खालीलप्रमाणे जागा उपलब्ध करून दिल्या आहेत. काशीदवस्ती १००६/२/ब, अयोध्यानगर सुमित्रा कॉलनी १२०० पैकी १२००/१,१२००/२/५/४८७, पारधे वस्ती ७६६, खोरे वस्ती मंडले वस्ती ४५६/१, मुसलमान वस्ती डोंबारी गल्ली ३१९१, सांगोला रोड ५ या ठिकाणी जागा दिले आहेत. संजय वाघमोडे यांनी वेळापूर सरपंच व ग्रामसेवक यांचे मनापासून आभार मानले आहेत.संजय वाघमोडे यांच्या प्रयत्नामुळे वेळापूर तालुक्यातील पंचक्रोशीतील अंगणवाड्यांच्या जागेचा प्रश्न मिटला.आता या अंगणवाड्यांसाठी लवकरच इमारती बांधणार असून विद्यार्थ्यांचे जागेविना होणारे त्रास कमी होणार आहेत.तसेच अंगणवाडी सेविकांनी त्यांचे मनापासून आभार मानले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button