महाराष्ट्र

श्री.स्वामी समर्थ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित आगरवाडी रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी-विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक- 7030516640

श्री.स्वामी समर्थ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित आगरवाडी रौप्य महोत्सवी वर्षा निमित्त श्री.समर्थ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित आगरवाडी व भक्ती वेदांत रुग्णालय आणि संशोधन मिरारोड मुंबई यांच्या सहकार्याने पालघर जिल्ह्यातील सफाळे पश्चिम आगरवाडी जिल्हा परिषद मराठी शाळेमध्ये रविवार दिनांक 03 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10:00 ते दुपारी 1:00 वाजेपर्यंत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

या शिबिरामध्ये डोळ्यांची पूर्ण तपासणी तसेच अल्पदरात चष्मे व रुग्णांना जनरल फिजिशियन सल्ला या आरोग्य शिबिरात डॉक्टरांकडून देण्यात येणार आहे.या शिबिरात या भागातील नागरिकांनी सहभागी होऊन आरोग्य सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन या सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अरविंद वामन पाटील, व संचालक उपाध्यक्ष दत्तात्रेय हरिभाऊ पाटील तसेच कार्यवाह किसन शिणवार किणी यांच्याकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button