आमदार राजेश पाटील यांच्या आमदार फंडातून विराथन बुद्रुक येथे नवीन रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन सरपंच सौ.अंजली किणी यांच्या हस्ते

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640
पालघर जिल्ह्यातील सफाळे विटी लाईन येथील विराथन बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीतील नानदगडी पाडा येथे बहुजन विकास आघाडीचे आमदार राजेश पाटील यांच्या आमदार फंडातून नवीन सिमेंट काँक्रिटीकरांच्या रस्त्याचे भूमिपूजन शनिवारी विराथन बुद्रुक ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच सौ.अंजली किणी यांच्या हस्ते करण्यात आले.

विराथन बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीतील नानदगडी पाडा येथील बबन किणी यांच्या घरापासून ते डीपी-मोरिस्टॉप या रस्त्याची दयनीय अवस्था झाली होती. याबाबत या गावातील ग्रामस्थांनी या रस्त्याची मागणी केली होती. या बाबीची दखल घेऊन बहुजन विकास आघाडीचे आमदार राजेश पाटील यांनी आपल्या आमदार फंडातून या रस्त्यासाठी 10 लाख रुपयांचा निधी मंजूर करून दिला आहे.

या नवीन रस्त्याचे भूमिपूजन शनिवार दिनांक 2 डिसेंबर 2023 रोजी विराथन बुद्रुक ग्रामपंचायत विद्यमान सरपंच सौ.अंजली किणी यांच्या हस्ते करण्यात आले
यावेळी या ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित महिला सदस्य सौ.कोमल कारभारी, अनिल किणी, अल्पेश भोईर माजी ग्रामपंचायत सदस्य व विटी-लाईन युवा अध्यक्ष बहुजन विकास आघाडी, तसेच दिलीप किणी ठाणे जिल्हा मच्छीमार समाज संघ निमंत्रित सदस्य तसेच महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती सदस्य आणि अखिल वैती समाज संस्था कार्यकारणी पालघर जिल्हा सदस्य, व मधुकर किणी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.



