महाराष्ट्र

राष्ट्रवादीचे नेते शिवाजी रामकृष्ण सावंत (माजी सैनिक) यांच्या पाठपुराव्यास यश—शासना कडून कांदा उत्पादकांना 350रु.अनुदान जाहीर

उपसंपादक—–हुसेन मुलाणी
टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्कृ
मो. 9730 867 448

तुळजापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तुळजापूर विधानसभा उपाध्यक्ष तथा माजी सैनिक शिवाजी रामकृष्ण सावंत यांनी केलेल्या पाठपुराव्यास यश आले आहे, नुकत्याच जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने कांदा उत्पादकाना एकरी रूपये ३५०/- अनुदान देण्याचे जाहीर केलेले असताना धाराशिव जिल्ह्यातील सर्व शेतकरी वर्ग नैसर्गिक संकटामुळे आर्थिक दृष्टिकोनातून कमजोर किंवा हतबल झालेला असून त्यामुळे सर्व बँक व्यवस्थापक शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अनुदानातून सक्तीची कर्ज वसुली न करण्याकरिता व शेतकरी आत्महत्या थांबवण्याकरीता

एका लेखी निवेदनाद्वारे राष्ट्रवादी पक्षाचे तुळजापूर विधानसभा उपाध्यक्ष श्री शिवाजी रामकृष्ण सावंत (माजी सैनिक) यांनी धाराशिव निवासी जिल्हाधिकारी श्री शिवकुमार स्वामी यांच्याकडे मागणी केले होती, या विषयाची गांभीर्य लक्षात घेऊन सदरील विषयी जिल्हा अग्रणी बँक अधिकारी धाराशिव यांना शेतकऱ्यांना मिळणाऱ्या कांदा अनुदानातून पीककर्ज वसूली नकरण्याचे निर्देश देण्यात यावे असे आदेशित करण्यात आले आहे त्याबद्दल संपूर्ण परिसरातील शेतकऱ्यांमध्ये उत्साह व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button