माळीनगर ग्रामपंचायत निवडणूकीत निवडुन आलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नुतन सदस्यांचा जंगी सत्कार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे माळशिरस तालुक्याच्या वतीने करण्यात आला.

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
माळीनगर ग्रामपंचायत निवडणूक 2023अत्यंत चुरशीची ठरली,एकहाती सत्ता असणाऱ्या रंजनभाऊ गिरमे यांच्या गटाला अत्यंत धक्कादायक निकालाला सामोरे जावे लागले,वास्तविक पाहता माळीनगर हा रंजनभाऊ गिरमे यांचाच बालेकिल्ला माळीनगर गाव जरी छोटं असलं तरी रंजनभाऊंनी माळीनगर गावाला सर्व सुखसोयींनी समृद्ध केले आहे, माळीनगरचा सर्वांगीण विकास केलेला आहे, पण काही अस्तनीतल्या सापांनी दगाफटका केल्यामुळे त्याना जरी सत्ता राखता आली नसली तरी माळीनगर मधील जनतेच्या मनावर अधिराज्य हे कालपण,आजपण आणि उद्यापण रंजनभाऊ यांचेच असणार आहे हे चिरकाल सत्य आहे.

17+1जागांपैकी केवळ 5 जागांवर या गटाचा विजय झाला,आणि त्या जागांवर निवडून आलेले ते पाचही उमेदवार हे कट्टर शिवसैनिक आहेत,संपर्क प्रमुख श्री.अनिल कोकीळ यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा प्रमुख श्री. संभाजी राजे शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तसेच तालुका प्रमुख श्री. संतोष (भैय्या)राऊत यांच्या सहकार्याने माळीनगर शहर प्रमुख श्री. अरुण मदने, जेष्ठ शिवसैनिक श्री. लक्ष्मण (तात्या)डोईफोडे व इतर कडवट शिवसैनिकांनी एकत्र येत
श्री.लक्ष्मण तात्या डोईफोडे,
श्री.मच्छिंद्र हजारे,
श्री.अनिल सकट,
सौ.शांताबाई गेजगे,
सौ.देवकर वहिनी ,
या पाच शिवसैनिक उमेदवार उभे करून निवडणूक लढवली आणि त्या पाचही जागा निवडुन आणल्या,शिवसेनेचे सगळेच उमेदवार निवडून आल्यामुळे माळीनगर मधील शिवसैनिकांमध्ये आनंदाचे,उत्साहाचे वातावरण आहे,

त्याच उत्साहात माळशिरस तालुक्याच्या वतीने,माळीनगर येथे त्या पाच नवनिर्वाचित वाघांचा जंगी सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला त्यावेळी तेथे माळशिरस तालुका प्रमुख श्री. संतोष(भैय्या)राऊत, ग्राहक संरक्षण कक्षाचे तालुका प्रमुख श्री. उमेश जाधव, तालुका उपप्रमुख श्री. महादेव बंडगर, माळीनगर शहर प्रमुख श्री. अरुण मदने, अकलूज शहर प्रमुख श्री. अनिल बनपट्टे, गट प्रमुख श्री मिलींद मोरे,जेष्ठ शिवसैनिक श्री विवेक देशमाने व मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.



