महाराष्ट्र

जिल्हा परिषद शाळा आलेगाव बुद्रुक तालुका माढा ची योग्य दिशेने प्रगती कडे वाटचाल.

नानासाहेब चंदनकर (टेंभुर्णी प्रतिनिधी) ८२०८५३०३३८

मौजे आलेगाव बुद्रुक येथील शाळेची स्थिती 2005 पासून अतिशय बिकट होती. विद्यार्थी संख्या कमी होती, शिक्षक संख्या कमी होती. त्यामुळे शाळेला अतिशय वाईट दिवस आले होते. त्यामध्ये स्थानिकांची पूर्ण दुर्लक्ष होते . अशा परिस्थितीमध्ये शाळा बंद पडण्याच्या मार्गावर होती, परंतु सन 2017 पासून ज्ञानेश्वर घोगरे सर आणि माननीय कोळी सर यांच्या प्रयत्नाने विद्यार्थी संख्या वाढून शाळेची इमारती सहित भौतिक सुविधानी युक्त अशी प्रगती झाली.

यामध्ये शाळेची रंगरंगोटी, पत्रा दुरुस्ती, नवीन वर्गखोली, प्रयोगशाळा, मुले मुली स्वतंत्र शौचालय, पिण्याच्या पाण्याची सोय, संरक्षक भिंत इ. सुख सोयी झाल्या हे काम करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक कोळी सर तसेच पालकांनी सहकार्य केले. इतर खर्च करण्यास कोळी सर सदैव तत्पर असतात . त्यामुळे मुलांची संख्या वाढून शाळेत गत वैभव प्राप्त झाले आहे. त्यांच्या या कार्यामुळे सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button