शहर

पालघर जिल्ह्यातील मनोर महामार्ग पोलिसांकडून “जागतिक स्मरण दिन” सप्ताह निमित्त जनजागृती

टाईम्स 9 मराठी न्यूज पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक 7030516640

रस्ते अपघातातील पीडित व्यक्तीच्या स्मरणार्थ 19 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर हा “जागतिक स्मरण दिन” सप्ताह पाळला जातो या अनुषंगाने महामार्ग पोलीस केंद्र मनोर येथे रस्ते अपघातामधील मयत व्यक्तींच्या स्मरणार्थ 2 मिनिटे उभे राहून मौन पाळून आदरांजली वाहण्यात आली. या दरम्यान महामार्ग पोलीस केंद्र मनोर येथे 3 अपघात ग्रस्त पीडितांचे नातेवाईक व 44 मृत्यंजय दुत उपस्थित होते. यावेळी वाहतूक नियामबाबतचे नियमित पालन कारणेबाबत सर्वांनी मिळून शपथ घेतली.

अपघात ग्रस्तचे नातेवाईक व मृत्यंजय दुत यांना पुष्प देउन वाहतुकीचे नियम पाळणे बाबत पोलीस विभागा मार्फत आवाहन करण्यात आले. उपस्थितांना वाहतुकीचे नियम समजावून सांगण्यात आले व नियम न पाळल्यास होणाऱ्या दुष्परिणामांची जाणीव करून देण्यात आली. ॲडव्होकेट रमेश चव्हाण, अंजना जगदाळे यांच्याकडून अपघातग्रस्त पिडीतांना शासनाकडून तसेच विमा कंपन्यांकडून मिळणारे अनुदान व त्याकरिता असणाऱ्या अटी व शर्ती याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

वाहन चालकांनी पुढील वाहतूक नियमांचे पालन करावे, मोटार साईकल चालवताना नेहमी हेल्मेटचा वापर करावा. चार चाकी वाहन चालवताना नेहमी सिटबेल्टचा वापर करावा. वाहन चालवताना नेहमी वेग मर्यादेचे पालन करावे. मद्यपान करून वाहन चालवू नये इत्यादी वाहतूक नियम सांगून महामार्ग पोलीस केंद्र मनोर हद्दीत महामार्गावर दर्शनी ठिकाणी जनजागृती फलक लावण्यात आले असून महामार्गवरील वाहनचालक व शाळा कॉलेज मध्ये जाऊन विद्यार्थ्यांना वाहतूक नियमाबाबत जागृती करुन नियम पाळण्याबाबत शपथ देण्यात येत आहे असे मनोर महामार्ग पोलीस केंद्राचे प्रभारी अधिकारी पवनकुमार ठाकूर यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button