शहर

सफाळे येथील जलसार ग्रामपंचायतीवर ग्रामविकास पॅनलचा झेंडा… सरपंच पदी साक्षी गावड.. तर उपसरपंचपदी विंकोश म्हात्रे विराजमान

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक-7030516640

पालघर जिल्ह्यातील सफाळे वीटीलाईन येथील जलसार ग्रामपंचायतीवर ग्राम विकास पॅनलने आपला झेंडा फडकवला आहे.

5 नोव्हेंबर 2023 रोजी झालेल्या या ग्रामपंचायतीच्या तिरंगी लढतीमध्ये ग्रामविकास पॅनलच्या सरपंच पदाच्या उमेदवार सौ. साक्षी गावड या बहुमताने विजयी झाल्या होत्या तसेच त्यांच्यासोबत त्यांच्या पॅनलचे विंकोश सुरेश म्हात्रे, प्रवीण भालचंद्र भोईर, सचिन पांडुरंग किणी, नितीन रामचंद्र भोईर, सौ.कीर्ती किशोर धोदडे, सौ पूजा सत्यम घरत, सौ. कमल संतोष गावड, आणि कुमारी अक्षता प्रकाश गावड हे 8 सदस्य उमेदवार विजयी झाले होते. व फक्त 1 बहुजन विकास आघाडीच्या सदस्य महिला उमेदवार बिनविरोध निवडून आल्या होत्या.
या ग्रामपंचायतीमध्ये एकूण 10 सदस्यांची निवडणूक झाली होती.

या 10 पैकी 9 जागांवर ग्राम विकास पॅनलच्या सदस्यांनी विजय प्राप्त केला होता.या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या शपथ ग्रहणाचा कार्यक्रम बुधवार दिनांक 22 नोव्हेंबर 2023 रोजी निवडणूक निर्णय अधिकारी विनोद पाटील यांच्या देखरेखीखाली ग्रामपंचायत कार्यालय जलसार येथे पार पडला यावेळी सौ.साक्षी गजानन गावड यांनी सरपंच पदाचा पदभार स्वीकारला व याच वेळी उपस्थित 10 नऊनिर्वाचित जलसार ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत उपसरपंच पदाची बिनविरोध निवडणूक पार पडली या बिनविरोध निवडणुकीमध्ये जलसार ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी विंकोश सुरेश म्हात्रे यांची बिनविरोध उपसरपंच पदी निवड करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button