महाराष्ट्र

अकलूजला घोडेबाजार सुरू होण्याचे कारण..!

कार्यकारी संपादक हमीद मुलाणी टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरात घोडेबाजार भरत होता २००९ नंतर अकलूजला घोडेबाजार भरू लागला या गोष्टीला अनेकांनी राजकीय रंग दिला.

मात्र कार्तिकीला यात्रेला पंढरपुरात भरत असलेल्या घोडेबाजार अकलूजला येण्यामागे महत्वपूर्ण कारण एक होते ते घोड्याना होणारा ग्लॅनडर नावाचा संसर्गजन्य रोग आणि माणूस त्यांच्या संपर्कात आला तर माणसांना देखील रोग होण्याची संभावना होती..

महाराष्ट्रात पाचगणी सातारा येथे घोड्यात या गॅलनडर रोगाची लक्षणे दिसली होती हे लक्षात घेता पंढरपुरातील टांगेवाल्याना देखील टांगा चालवाला निर्बंध घातले होते.
कार्तिकी एकादशी यात्रेच्या तोंडावर पंढरपुरात घोडेबाजार चालू करण्यास स्थानिकांचा प्रचंड विरोध झाला होता. स्थानिक प्रशासनाने देखील हात वर केलेले होते. जवळपास पंढरपुरात घोडेबाजार भरणार नसल्याचे निश्चित झाले होते

सोलापूर जिल्ह्याचे कायमच सामाजिक राजकीय पालकत्व घेतलेले मोहिते-पाटील कुटूंबाने या गोष्टीकडे लक्ष घातले.. पंढरपुरात भरणारा घोडेबाजार जिल्ह्याच्या बाहेर जाऊ नये.. व्यापाऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून धैर्यशिल मोहिते-पाटील यांनी घोडे व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन पुढाकार घेतला व्यापाऱ्यांना आर्थिक मदत केली व विजयदादांच्या मार्गदर्शनपर अकलूज कृ.उ.बाजार समितीच्या माध्यमातून अकलूजला घोडेबाजार भरवला.

ग्लॅनडर या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर अकलूज कृ.उ.बाजार समितीने प्रत्येक घोड्याला बांधण्याच्या ठिकाणी सावली, मोफत चोवीस तास पाणी,औषधांची फवारणी, व्हेटरनरी डाॅक्टरांची टिम उपलब्ध करून दिली.
या दर्जाच्या सुविधा देऊन पंढरपुराच्या ऐवजी अकलूजला २००९ ला पहीला घोडे बाजार भरून यशस्वीरित्या पार पडला.. आज तागायत या सर्व सोयी घोडे बाजाराला मोफत पुरवल्या जातात.

पडद्या पाठीमागील गोष्ट सांगण्याचा उद्देश कोणतीही गोष्ट सुरू करण्यास पुढाकार घ्यावा लागतो. राजकारणा असो की समाजकारण, धैर्यशिल मोहिते-पाटील हा माणूस पुढाकार घेणारा नेता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button