महाराष्ट्र

अकलूज नगरपरिषद निवडणुकीसाठी ‘नव्या’ आरक्षणाचे चित्र स्पष्ट…

🎯 १३ प्रभागांतील २६ जागां साठी सोडत जाहीर…महिलांसाठी १३ जागा आरक्षित

आमीर मोहोळकर
टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499

अकलूज नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेच्या १३ प्रभागांतील २६ जागांसाठी आज आरक्षण सोडत कार्यक्रम विजया पांगारकर,उपविभागीय अधिकारी अकलूज यांच्या अध्यक्षतेखाली शांततापूर्ण वातावरणात पार पडला…

या सोडतीमुळे अकलूज नगरपरिषदेतील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली असून,अनेक इच्छुक उमेदवारांच्या भावी वाटचालीस नवी दिशा मिळाली आहे.आरक्षणाचे स्वरूप आणि सोडतीची प्रक्रिया
नगरपरिषद कायद्यानुसार १३ प्रभागांमधील २६ जागांपैकी १३ जागा (५०%) महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत…

या १३ जागांसाठी तसेच पुरुषांसाठी राखीव असलेल्या उर्वरित जागांसाठी सोडत काढण्यात आली,सोडतीसाठी लहान मुलींच्या हस्ते चिठ्ठ्या उचलण्यात आल्या.त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे आणि निष्पक्ष पद्धतीने पार पडली,अशी माहिती उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिली…

कोणत्या प्रभागात काय आरक्षण…?आरक्षण सोडतीनुसार,अनेक महत्त्वाचे प्रभाग आरक्षित झाले आहेत,ज्यामुळे अनेक भावी नगरसेवकांना त्यांचे प्रभाग बदलावे लागण्याची शक्यता आहे…

अनुसूचित जाती (महिला) आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) साठी आरक्षित झालेल्या प्रभागांमुळे अनेक नवीन महिला उमेदवारांना संधी मिळणार आहे,सर्वाधिक लोकसंख्या असलेले प्रभाग आता नवीन उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास प्रोत्साहन देतील…

निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार,या सोडतीचा सविस्तर तपशील आणि प्रभाग निहाय आरक्षण यादी लवकरच अकलूज नगरपरिषद कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रदर्शित केली जाईल.इच्छुक उमेदवारांना आणि नागरिकांना ही यादी तपासून घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे…

नगराध्यक्ष पदाचे आरक्षण अनुसूचित जाती (महिला) साठी निश्चित झाल्यामुळे आता सर्वच राजकीय पक्षांमध्ये आणि स्थानिक गटांमध्ये उमेदवारांच्या चाचपणीला खरी गती मिळणार आहे,अकलूज नगर परिषदेच्या पहिल्या “नगराध्यक्षा” होण्याचा मान पायल मोरे,रेश्मा गायकवाड,अनुराधा संजय साठे आणि रेश्मा लालासाहेब अडगळे यांच्या पैकी कोणाला मिळतो…? हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे…

परिशिष्ठ २ नुसार अनुसूचित जातीसाठी आरक्षित प्रभाग

आरक्षित प्रभाग संख्या:०६.

प्रभाग क्रमांक :०९,०७,१०,०२,०३,११.

अनुसूचित जाती – महिला (एकूण ३ प्रभाग)

१, प्रभाग क्रमांक:-१०
२. प्रभाग क्रमांक:-०२
३. प्रभाग क्रमांक:-०७

नागरिकांचा मागास प्रवर्ग – महिला (एकूण ४ प्रभाग)

१. प्रभाग क्रमांक:-०५
२. प्रभाग क्रमाक:-१२

  1. प्रभाग क्रमांक:-०८
    ४. प्रभाग क्रमांक: ०६

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button