शहर

माॅडेल हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात

माळीनगर —प्रतिनिधी
रियाज –मुलाणी
मो. 9921 500 780

दी सासवड माळी एज्युकेशन सोसायटी माळीनगर संचलित दी मॉडेल विविधांगी प्रशाला माळीनगर येथील साल २००६ मधील इयत्ता दहावी वर्षातील माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा माळीनगर येथे मोठ्या उत्साहात पार पडला.

 माॅडेल हायस्कूल शाळेच्या आवारात सदर स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता यासाठी शाळेचे २००६ सालातील माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी झाले होते. यावेळी प्रतिमा पूजन शाळेचे माजी विद्यार्थी विनायक धायगुडे याच्या हस्ते करण्यात आले त्यावर्षी दहावी बोर्ड परिक्षेत शाळेत प्रथम क्रमांक आलेल्या प्राजक्ता रिसवडकर हिचा संयोजन समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच आपापल्या क्षेत्रात नावलौकिक मिळविलेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

   यावेळी अमोल गेजगे याने मनोगत व्यक्त केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आकाश राऊत , पंकज भोरे , विजय शेंडगे , फिरोज शेख , प्रियंका शेटे , श्वेता यादव यांनी परिश्रम घेतले तसेच संस्थेचे सचिव प्रकाश गिरमे , खजिनदार पृथ्वीराज भोंगळे , प्राचार्य प्रकाश चवरे यांनी सहकार्य केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाळ लावंड यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button