शहर

भारतीय जनता युवा मोर्चा सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष – ॲड. रणजित भोसले यांनी सोलापूर जिल्हयाचे पालकमंत्री विखे- पाटील यांना दिले गुंठेवारी बाबत निवेदन

उपसंपादक——– हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो . 97 30 867 448

महाराष्ट्र राज्यातील गुंठेवारी पद्धतीवर तत्कालीन सरकारने दि.१२-४- २०२१ रोजी तुकडे स्थगीती संदर्भात परिपत्रक काढण्यात आले होते. त्या अनुषंगाने NA म्हणजेच अकृषीक केलेल्या जमीनी वगळता इतर जमिनीचे तुकडे पाडुन त्यात तुकड्यांची (गुंठेवारी) विक्री करुन रजिस्टर म्हणजे दस्त नोंदणी करणे बंद झालेले आहे.

महाराष्ट्र राज्यात प्रामुख्याने सर्व सामान्य जनता ही राहण्याच्या प्रायोजनार्थ १ ते २ गुंठे घर बांधण्यासाठी घेत असतात. पण अलिकडच्या काळात काही लोकांना १-२ गुंठे घेणे अशक्य झाले आहे. खरेदी केल्यानंतर ज्यांनी १-२ गुंठे जागा खरेदी केल्या आहेत त्यांच्या नावावर दस्त होत नाही. त्यांच्या नावावर जागा होत नाही. तसेच लोकांना केंद्र व राज्य शासनाने घरकुल सारख्या योजना दिलेल्या आहेत. त्या योजनेचा लाभ हि घेता येत नाही. तरी आपल्या माध्यमातून मंत्रीमंडळ मध्ये हा विषय तात्काळ मार्गी लावा अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाउपाध्यक्ष ॲड. रणजीत भोसले यांनी निवेदन दिले. या वेळी पालकमंञी यांनी हा महत्वपूर्ण विषय असुन तात्काळ मार्गी लावण्याच काम येणाऱ्या काळात लवकरच करणार असल्याच सांगितले . या प्रसंगी ॲड.रणजित भोसले यांनी पालकमंञी यांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button