महाराष्ट्र

म्हसोबा दुध संकलन केंद्राचा दूध उत्पादकांना दिवाळी भेट

टाईस्म 9 मराठी न्यूज: सांगली जिल्हा प्रतिनिधी: आनंद सावंत, मो 8007 93 2121

सांगली : रेठरेधरण तालुका वाळवा जिल्हा सांगली येथील रयत क्रांती संघटनेचे नेते अमोल पाटील यांचे म्हसोबा दुध संकलन केंद्र येथे दिवाळी बोनस वाटप कार्यक्रम रयत क्रांती संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. सागर खोत यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमाला उपस्थित राहून म्हसोबा दूध संस्थेत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या..

म्हैस दुधासाठी प्रति लिटर 4 रुपये 10 पैसे व गाई दुधासाठी प्रति लिटर 3 रुपये 10 पैसे, याप्रमाणे रेठरेधरण मधील उच्चांकी बोनस त्यांनी काढलेला आहे नक्कीच याचा फायदा दूध उत्पादक शेतकऱ्यांना होईल. तसेच सर्वात जास्त दूध घालणाऱ्या दूध उत्पादकांना वेगवेगळी बक्षीस देण्यात आली. यावेळी उपस्थित आदरणीय युवा नेते अमोल पाटील, बाबुराव पाटील, दिलीप पाटील, गुणवंत पाटील, चंद्रकांत घोरपडे, सनी पवार, अक्षय पाटील, सूर्यकांत पाटील तसेच म्हसोबा पार्टीचे पॅनल प्रमुख उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button