महाराष्ट्र

निवडणुकीचा जल्लोष आणि आरक्षण आंदोलनावेळी केलेली विधाने…

टाईम्स9 मराठी न्यूज – सांगली जिल्हा प्रतिनिधी: आनंद सावंत मो 8007 93 2121

निवणुकीचा जल्लोष आणि आरक्षणावेळी केलेली विधाने….

महाराष्ट्रात काल बऱ्याच ग्रामपंचायतीच्या निवडणूका झाल्या आणि आज त्यांचे 10 वाजल्यापासून निकाल जाहीर होत आहेत. टीव्ही वरील कोणत्याही न्यूज चॅनेल वर निकालानंतरचा जल्लोष बघायला मिळत आहे. गुलालाने माखलेले, मोटार सायकली पुंगळ्या काढून जोरदार पणे पळविणारे, मोठ्या प्रमाणावर आतषबाजी करणारे आणि डॉल्बी समोर नाचनारे आणि नारेबाजी करणारे कार्यकर्ते बघितल्यावर मराठा आरक्षणाच्या प्रश्नाचा लवलेश पण कुठे बघायला मिळत नाही.

आपापल्या बड्या नेत्यांच्या नावाने जोरदार घोषणाबाजी करणारे कार्यकर्ते बघितल्यावर हेच का ते मराठा तरुण की काही दिवसांपूर्वी आरक्षणाच्या नावाने दंगा करुन याच नेत्यांच्या पोस्टरला जोड्याने मारत होते तर काही जण त्यांच्या पोस्टर वर मूत्र विसर्जन करत होते. मी त्याच म्हटले होते की मराठी समाज चंचल आहे. निवडणूक आली की सर्व विसरुन जातील. आणि हेच सत्य आहे. आपण मूर्ख तर आहोतच पण नेते मंडळी आपणास पुन्हा पुन्हा मूर्ख बनवतात व आपण पण पुन्हा पुन्हा ते सिद्ध करत असतो.

(एका मराठा तरुणाचे मत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button