शहर
अकलूज – फोंडशिरस बससेवा सुरू करण्यासाठी अकलुज आगार प्रमुखा कडे बहुजन ब्रिगेड महासंघाची मागणी

विशेष प्रतिनिधी माळीनगर—रियाज मुलाणी, टाइम्स 9 मराठी न्यूज
मो-9921 500780
फोंडशिरस ता.माळशिरस जि.सोलापूर येथील शालेय विद्यार्थी, प्रवाशी, नागरिक, शेतकरी, ग्रामस्थ यांच्या सोईकरिता दळणवळणाचा एकमेव मार्ग हा फोंडशिरस-सदाशिवनगर-माळशिरस-अकलुज हा आहे .तेथील नागरिकांना अनेक दैनंदिन कामाकरिता सदाशिवनगर मार्गे जाणे भाग पडत आहे परंतु तेथे बससेवेची सोय नसल्याने अनेक समस्यांना नाईलाजाने तोंड द्यावे लागत आहे
तसेच अवैध प्रवाशी वाहतुकीमुळे जिव धोक्यात घालुन प्रवास करीत पिळवणूक सहन करीत आहेत.
तरी अकलूज आगारा मार्फत तात्काळ बस सेवा चालु करुन जनतेची होणारी गैरसोय दूर करण्याकरता अकलुज आगार व्यवस्थापक विकास पोफळे यांना बहुजन ब्रिगेड महासंघाचे संस्थापक अध्यक्ष संदिप मोहीते यांनी बहुजन ब्रिगेड महासंघाच्या वतीने निवेदन देऊन मागणी करण्यात आली .



