सफाळे येथील निसर्गवासी काळूराम काका धोदडे उड्डाणपूला वर वाहतूकदारांना करावा लागतो जीवावर उदार होऊन प्रवास

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640
लाखो करोडो रुपये खर्च करून बांधण्यात आलेला सफाळे येथील निसर्गवासी काळूराम काका धोदडे उड्डाण पूलाचे काम निकृष्ट दर्जाचे केल्यामुळे या नवीन उड्डाण पूलाच्या रस्त्यावरील लोखंडी रोड आणि लोखंडी सलिया बाहेर आल्यामुळे या उड्डाण पूलावरून वाहतूकदारांना प्रवासी वाहतूक करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

रविवार दिनांक 30 मार्च 2025 रोजी या उडान पूलाचे उद्घाटन करून हा उड्डाणपूल वाहतूकदारांसाठी खुला करण्यात आला आहे. या उड्डाण पूलावर जाण्यासाठी सफाळे नूतन नगर इथून जाताना या रस्त्याच्या मधोमध सिमेंट मालाचा कमी वापर केल्यामुळे या रस्त्यावरील लोखंडी रोड तसेच लोखंडी सलिया बाहेर आले आहेत यामुळे वाहतूकदार आपली प्रवासी वाहतूक करत असताना अपघाताच्या भीतीमुळे तारेवरची कसरत करून या मार्गाने वाहतूक करत आहेत.



