महाराष्ट्र

निमा अकलूज शाखेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन…

विशेष प्रतिनिधी टाइम्स 9 न्यूज,अकलूज

केंद्रीय निमा शाखा यांच्या संवेदना 2 उपक्रमांतर्गत देशभरामध्ये निमाच्या प्रत्येक शाखेमध्ये दिनांक 19/03/2025 ते 30/03/2025 या कालावधीमध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे,या देशव्यापी शिबिरामध्ये 1500000 रक्तदान करून वर्ल्ड रेकॉर्ड बनेल अशी आशा आहे त्या अनुषंगाने निमा अकलूज शाखेने दिनांक 19/03/2025 ते 23/03/2025 या कालावधीमध्ये अकलूज येथे सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील ब्लड बॅँक येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते…

रक्तदान शिबिराचे उद्घाटन ब्लड बँक चे वैद्यकीय अधिकारी डॉ संतोष खडतरे सर यांच्या अध्यक्षतेखाली व माझी एम सी आय एम सदस्य डॉ तानाजीराव कदम सर व केंद्रीय निमा संघटनेचे बॉडी मेंम्बर डॉ मिलिंद गुळभिले सर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये पार पडले…

उदघाटन प्रसंगी मंचावरती निमा संघटनेचे अध्यक्ष डॉ अमोल माने तसेच निमा वुमन्स फोरमच्या अध्यक्षा डॉ विद्या एकतपुरे मॅडम,निमा वुमन फोरम च्या फाउंडर अध्यक्षा डॉ अंजली कदम मॅडम उपस्थित होते…

रक्तदान शिबिरामध्ये तालुक्यातील डॉक्टर तसेच लेडीज डॉक्टर,प्यारामेडीकल स्टाफ यांनी बहुसंख्येने रक्तदान केले.इतर रक्तदाते ही उपस्थित होते.निमाच्या सर्व टीम च्या प्रामाणिक प्रयत्नातून एकूण 54 जणांनी रक्तदान केले…

रक्तदान शिबिर यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी निमाचे अध्यक्ष डॉ अमोल माने अध्यक्षा डॉ विद्या एकतपुरे मॅडम उपाध्यक्ष डॉ हर्षवर्धन गायकवाड सचिव डॉ दादासाहेब पराडे पाटील कोषाध्यक्ष डॉ दिलीप पवार निमा वुमन फोरम च्या कोषाध्यक्षा डॉ रुपाली पराडे पाटील,माझी अध्यक्ष डॉ शिरीष रनणवरे सर डॉ प्रशांत निंबाळकर डॉ हरीचंद्र सावंत पाटील डॉ उदय माने देशमुख,डॉ उत्तम खरात डॉ सुधीर पोफळे व निमाचे सर्व पदाधिकारी व निमा मेंम्बर यांनी प्रयत्न केले…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button