पश्चिम रेल्वेचे सफाळे फाटक बंद केल्याच्या निषेधार्थ रेल्वे प्रशासनाचा निषेध… सफाळे विकास कृती समितीच्या वतीने शुक्रवारी जन आक्रोश आंदोलन

टाईम्स मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640
पश्चिम रेल्वेच्या रेल्वे प्रशासनाने मनमानी पद्धतीने कोणत्याही पर्यायी मार्गाची व्यवस्था न करता सफाळे रेल्वे फाटक कायमस्वरूपी बंद केला आहे.
याचा निषेध म्हणून सफाळे विकास कृती समितीने रेल्वे प्रशासना विरुद्ध शुक्रवार दिनांक 4 एप्रिल 2025 रोजी जनआक्रोश आंदोलनाची हाक दिली आहे.

या आंदोलनाला सफाळे बाजारपेठेतील व्यापारी वर्ग, संघटना आणि सफाळे भागातील अनेक ग्रामपंचायतीने पाठिंबा दर्शविला असून या आंदोलनामध्ये सफाळे भागातील सरपंच सदस्य, ग्रामस्थ आणि प्रवासी वर्ग मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहेत.हे जन आक्रोश आंदोलन शुक्रवारी सकाळी 9:00 वाजता सफाळे रेल्वे फाटक (पश्चिम) बस डेपो जवळ करण्यात येणार आहे.
या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होण्यासाठी सफाळे भागातील नागरिकांना सफाळे विकास कृती समितीच्या वतीने आवाहान करण्यात आले आहे.



