शहर

महागाव मध्ये धिक्कार मोर्चाने वेधले लक्ष(सरकारी, निम्न सरकारी,संघटित,असंघटित कर्मचारी,बेरोजगार,पेन्शनर्स व शेतकरी कृती समितीचे आयोजन)

प्रतिनिधी-मायाताई सागर पाईकराव यवतमाळ

महागाव :- केंद्र व राज्य सरकारच्या कर्मचारी व सर्वसामान्य नागरीकांच्या संबंधातील शासनाच्या धोरणामुळे निर्माण झालेल्या असंतोषाची जाणीव करुन देण्याकरीता सरकारी,निम्न सरकारी खाजगी क्षेत्रातील संघटित असंघटित कर्मचारी,बेरोजगार,पेन्शनर्स व कृती समितीच्या वतीने महागाव मध्ये धिक्कार मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.व राज्य सरकारने मागील काही वर्षांमध्ये घेतलेल्या निर्णयांचा संघटीत,असंघटीत क्षेत्रातील तसेच सरकारी,निमसरकारी व खाजगी क्षेत्रातील कर्मचारी,बेरोजगार, पेंशनर्स,शेतकरी व सर्वसामान्य नागरीकांच्या जिवनमानावर विपरीत परिणाम झाला असल्याने अशा निर्णयांमुळे समाजातील सर्वच क्षेत्रामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.

तसेच सर्वसामान्य नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.विविध मुद्दयांवर राज्य सरकार तातडीने निर्णय घेण्यास तत्पर असतांना उपरोक्त क्षेत्रातील कामगार,कर्मचारी यांचे संदर्भात मात्र निर्णय घेत असतांना राज्य शासन तत्परता दाखवित नसल्याची भावना दिवसेंदिवस वृद्धिंगत होत आहे.

विविध क्षेत्रातील कामगार, कर्मचारी, बेरोजगार, शेतकरी,इत्यादी आपापल्या मागण्यांबाबत सतत पाठपुरावा करीत असतांना त्यांना केवळ आश्वासने मिळतात.त्यामुळे जनमाणसात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.या असंतापाला वाचा फोडण्यात यावी अशी मागणी यवतमाळ जिल्हयातील विविध क्षेत्रात कार्यान्वित असलेल्या संघटनांनी एकत्र येऊन केली असून याबाबत आंदोलनात्मक भूमिका घेण्याचा ठराव एकमुखानं घेतला गेला.

तेव्हा शासनाच्या नकारात्मक भुमिकेबाबत या सर्व संघटनांनी दिनांक २४सप्टेंबर २०२३च्या यवतमाळ येथील मोर्चा नंतर आंदोलनाचा दुसरा टप्पा तालुक्याच्या ठिकाणी आंदोलन करण्याचा असुन त्याचं अनुषंगाने दिनांक २९ ऑक्टोंबर २०२३ महागांव तालुक्यामधे “धिक्कार मंचाचे” आयोजन करण्यात आले होते या मोर्चामध्ये महागाव तालुक्याचे कर्मचारी. बेरोजगार, शेतकरी व पेन्शनर्स मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी मोर्चेकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना दिले.यावेळी मुख्य निमंत्रक ग्यानबा गुट्टे पाटील,गजानन नांदेडकर,सुनील हिंगमिरे,राजेश वैद्य, मार्गदर्शक पुंडलिक बुटले,प्रभाकर अडलुरे,गजानन काळसरे,ललीत इंगोले साहेब,अंभोरे सर,लक्ष्मण मुरकुटे,अभिमान मुंडे,पांडे सर,वर्षा पानपट्टे,शकुंतला इंगोले, शारदा दामधर,मानतुटे ताई,अनिता गणोरकर,अर्चना भरकाडे,अमरदिप पाटील,बावणे साहेब,साहेबराव भांगे,शंकर जायम्हेत्रे यांच्यासह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button