शिवसेनेचे ५० हजार महिला पुरुषांपर्यंत डाळीचे वाटपनातेपुते येथे पार

महेश मोहिते प्रतिनिधी माळशिरस
प्रभाग क्र ५ नातेपुते शिवसेना भवन येथून प्रारंभ करून नारीशक्ती सन्मानाच्या पार्श्वभूमीवर सर्वांची दसरा दिवाळी गोड करण्यासाठी राबविलेल्या सवलतीच्या दरातील डाळ वाटपाचा शिवसेना तालुकाप्रमुख राजकुमार हिवरकर पाटील यांनी ५० हजार महिला,पुरुषांपर्यंत पोहोचविण्याचा टप्पा पार केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार,आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत,शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख प्रा.शिवाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाच्या वतीने आलेल्या प्रत्येक आधार कार्डाला ५ किलो सवलतीत ६० रुपये प्रमाणे हरभरा डाळ वाटपाच्या उपक्रमाला सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

त्याचबरोबर संवेदनशील मुख्यमंत्री यांनी शासन आपल्या दारी योजना आणून सर्वसामान्यांना एक वेगळा
पांयडा पाडला त्याच धर्तीवर दसरा दिवाळीच्या मुहूर्तावर नारीशक्तीचा सन्मान म्हणून माता-भगिनींसाठी शिवसेनेच्या वतीने जणू मुख्यमंत्र्यांच्या कार्याची प्रचितीच आणून दिली

नातेपुते व पंचक्रोशीतील शिंदेवाडी, गिरवी, कारूंडे, मांडवे,फोंडशिरस,कुरबावी, एकशिव यासह विविध गावातील सर्वांपर्यंत हरभरा डाळ पोहोचविण्यासाठी शिवसेना तालुकाप्रमुख राजकुमार हिवरकर,तालुका उपप्रमुख नितीन कोरटकर,दहिगाव जि.प.गटप्रमुख प्रमोद चिकणे,गटनेते दादाभाई मुलाणी,शहरप्रमुख पोपटराव शिंदे,भाजपचे मनोज जाधव,भाजप मीडिया प्रमुख सुनील बनकर,सतीश बरडकर,मोहनतात्या हिवरकर,जय महाराष्ट्र कामगार संघटनेचे संदीप भागवत,माऊली देशमुख,सनी बरडकर,सुरेश तवटे,सागर साळुंखे,विनायक शिंदे,रियाज शेख आदिसह शिवसेना पदाधिकारी,कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.



