महाराष्ट्र

यंत्राने रोजगार हमी ची कामे करून कागदोपत्री मजुरांनी केली दाखविल्याचा बोगस प्रकार उघडकीस

उपसंपादक ——-हुसेन मुलाणी
टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
मो. 9730 867 448

छत्रपती संभाजीनगर: राज्यात महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत कामाचे शंभर दिवस पूर्ण करणाऱ्या कुटुंबांची संख्या १ लाख ३० हजार ३७ एवढी असून अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक २४ हजार ८६९ तर त्या खालोखाल पालघर १३ हजार ६६२, बीड जिल्ह्यात १० हजार ४७ कुटुंबांची संख्या आहे. रोजगार हमीअंतर्गत कुटुंबांना अकुशल स्वरूपाची कामे उपलब्ध होताहेत. ग्रामीण भागात ज्यांना रोजगाराची जास्त साधने उपलब्ध नसताना अशांसाठी रोजगार हमी योजना फायद्याची ठरते. मात्र, कमी पैसे मिळत असल्याने यात शंभर दिवस पूर्ण करणाऱ्यांची संख्या कमी आहे.

रोहयोसाठी राज्यात कोट्यवधींचा निधीमहात्मा गांधी नरेगा योजनेअंतर्गत २०१९-२० मध्ये महाराष्ट्रासाठी १ हजार ७२३.२५ कोटी, २०२०-२१ १ हजार ६३८.७८, २०२१-२२ मध्ये २ हजार ९३.७२ कोटी, २०२२-२३ या वर्षात २ हजार ३४६.५७ कोटी रुपये जारी करण्यात आले. मागील चार वर्षांत महाराष्ट्रात निधी जारी होण्याचा आलेख हा चढता आहे.देशात २०२२-२३ या वर्षात उत्तर प्रदेश ९ हजार ९३२,५५, राजस्थान ८ हजार ८१९, तमिळनाडू ८ हजार ६४१.६७, आंध्रप्रदेश ६ हजार ७०६.८, कर्नाटक ६ हजार १३३.५९, बिहार ५ हजार ८७८.५४, मध्यप्रदेश ५ हजार ६६९.५७ कोटी रुपये जारी (इश्यू) करण्यात आले.राज्यात दरवर्षी तीन लाखांच्या पुढे कामे पूर्णरोजगार हमीतून महाराष्ट्रात २०१७-१९ मध्ये २ लाख ४३ हजार ४७९, २०१८-१९ मध्ये ३ लाख २४ हजार ३५३, २०१९-२० मध्ये ३ लाख ३५ हजार ३६०, २०२०-२१ मध्ये २ लाख ६२ हजार १६४ तर २०२१-२२ मध्ये २ लाख ३१ हजार ८२० कामे पूर्ण करण्यात आली.२०२१-२२ या वर्षात नंदुरबार, नाशिक, यवतमाळ, जळगाव, गोंदिया, धुळे, बुलडाणा, अकोला, नगर जिल्ह्यांत सर्वाधिक कामे पूर्ण करण्यात आली. २०२० पासून रोहयोचे कामे पूर्ण करण्यात घट झाली आहे.

काही ठिकाणी यंत्राने कामेरोजगार हमी योजनेच्या नावाखाली काही ठिकाणी यंत्राने कामे केल्याच्या तक्रारी येतात. कामे तर रोजगार हमी योजनेतून करायची असतात मात्र काही ठिकाणी रोजगार कामावर येतच नाही. त्यामुळे कामे यंत्राने पूर्ण करून ती कागदोपत्री मजुरांना केली असे दाखविल्याचे प्रकार घडले आहे. काही गावांत मजूर रोजगार हमीची कामे करण्यापेक्षा इतर ठिकाणी रोजंदारीवर जाणे पसंत करतात. त्यामुळे रोहयोचे शंभर दिवस पूर्ण करणाऱ्या कुटुंबाची संख्या कमी भरते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button