मोदी सरकार यांनी राहुल गांधी यांच्यावर सूडबुद्धीने केलेल्या कारवाईबाबत माळशिरस तालुका काँग्रेस कमिटी आक्रमक

उपसंपादक ——–हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448
मोदी सरकारने राहुल गांधी यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई करून त्यांना खासदार पदापासून वंचित ठेवण्याचा प्रकार भाजपने केला असून त्याबाबत देशभरात काँग्रेस पक्ष आक्रमक झाला असून राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ काँग्रेसचे कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरिक रस्त्यावर उतरले असून त्या अनुषंगाने माळशिरस तालुका काँग्रेस कमिटी व अकलूज शहर काँग्रेस कमिटी च्या वतीने सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली अकलूज येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन निषेध व्यक्त करण्यात आला असून काँग्रेस पक्षाच्या वतीने राहुल गांधी यांच्या संदर्भातील खालील मुद्दे पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आले
राहुल गांधी यांनी 7 फेब्रुवारीला संसदेत अदाणी घोटाळा संदर्भात प्रश्न विचारले, अदानी उद्योग समूहात गुंतवलेल्या शेल कंपन्यातील 20 हजार कोटी रुपये कोणाचे ,यामध्ये एक चिनी नागरिकांचाही सहभाग आहे, तो चिनी नागरिक कोण? उद्योगपती गौतम आदाणी आणि नरेंद्र मोदी यांचे संबंध काय ?विमानतळ संरक्षण क्षेत्र, ऊर्जा क्षेत्रात मोदी सरकारने आदाणीला कशी मदत केली ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, बांगलादेश ,दौऱ्यात पंतप्रधान मोदींनी अदानी ला सोबत घेऊन गेले व तेथील कंत्राटे देण्यासाठी दबाब आणला याचे काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी कागदपत्रासह पुरावे दिले .राहुल गांधी व मल्लिकार्जुन खर्गे यांनी संसदेत आदाणी घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित केला. परंतु या दोघांच्या भाषणाचा भागच संसदेच्या कामकाजातून वगळण्यात आला .

आगामी घोटाळ्याची संयुक्त संसदीय समिती गठीत करुन जेपीसी चौकशी करण्याची मागणी काँग्रेस पक्षाने लावून धरली आहे. परंतु मोदी सरकार संसदेचे कामकाज चालू देत नाही. सत्ताधारी पक्षच संसदेचे कामकाज चालू देत नाहीत. काँग्रेस पक्ष जेपीसी ची मागणी करतात संसदेचे कामकाज स्थगित केले जाते अदानीला वाचवण्यासाठी मोदी सरकार सर्व शक्ती पणाला लावत आहे, मोदी सरकारमधील मंत्र्यांनी राहुल गांधी यांच्यावर खोटे आरोप लावले त्यावर राहुल गांधी यांनी संस्थेत उत्तर देण्याची तयारी दाखवली पण त्यांना बोलण्याची परवानगी दिली जात नाही,
राहुल गांधी यांनी संसदेत अदानी घोटाळ्यावर मोदी सरकारला प्रश्न विचारल्यानंतर 9 दिवसानंतर राहुल गांधी यांच्या विरोधातील मानहानीचे प्रकरण बाहेर काढण्यात आले व गुजरात मधील कोर्टाने राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली ,आणि 24 तासातच त्यांची खासदारकी रद्द केली व आता शासकीय निवास खाली करण्याची नोटीस पाठवली , मोदी सरकार राहुल गांधी यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई करत आहे अदाणी घोटाळ्याची चर्चाच होऊ नये म्हणून भाजपा जाणीवपूर्वक राहुल गांधी वर खोटे आरोप करून जनतेचे लक्ष विचलित करून दुसरीकडे वळवत आहेत, परदेशात राहुल गांधी यांनी देश विरोधी वक्तव्य केल्याचा त्यांच्यावर आरोप केला जात आहे परंतु त्यात काहीही तथ्य नाही .
राहुल गांधी आणि ओबीसी समाजाचा अपमान केला असा भाजपा कडून धादांत खोटा आरोप केला जात आहे निरव मोदी, ललित मोदी हे ओबीसी समाजाचे नाहीत भाजप ओबीसी समाजाचा संबंध भ्रष्टाचाराशी जोडून ओबीसी समाजाचा अपमान करत, आहेत काँग्रेस पक्षात ओबीसी समाजाचा योग्य सन्मान राखला जातो सध्या काँग्रेसचे दोन मुख्यमंत्री ओबीसी समाजाचे आहेत राहुल गांधी देश जोडण्याचा संकल्प घेऊन संपूर्ण भारतभर 4000 km ची पद यात्रा केली ते एका जात समुदायाचा अपमान कशासाठी करते मोदी सरकार चोर दरोडेखोर घोटाळेबाजांचा पर्दाफाश करणाऱ्या राहुल गांधी यांना लक्ष करून त्यांच्यावर कारवाई करत आहे

पण काँग्रेस पक्ष अत्याचारी जुलमी सत्तेला घाबरली नाही मोदी सरकारला घाबरणार नाही लोकशाही संविधान व देश वाचवण्यासाठी ही लढाई असून काँग्रेसची लढाई जनतेच्या दरबारात लढेल विजयी होईल असा विश्वास काँग्रेस पक्षाला असून काँग्रेस पक्ष कॉर्नर सभा घेऊन आंदोलन करून मोदी सरकारचा निषेध करणार असुन याबाबत काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून निषेध व्यक्त करणार असल्याचे यावेळी माळशिरस तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सतीश नाना पालकर यांनी सांगितले
याप्रसंगी अकलूज शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष -नवनाथ साठे, सहकार सेलचे अध्यक्ष- रणजितसिंह देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष -अण्णासाहेब इनामदार जिल्हा उपाध्यक्ष -अण्णासाहेब शिंदे अकलूज महिला काँग्रेस शहराध्यक्ष शैला गोसावी, पश्चिम महाराष्ट्र सोशल मीडिया प्रमुख– मयूर माने ,उपाध्यक्ष -भारत मगर, मौलाना तय्यबअली ,जावेद बागवान, (छोटा)मोहसिन बागवान, जावेद शेख ,कैलास जाधव ताहेर मोहोळकर जावेद बागवान. केशव लोखंडे अमोल चिकने आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते



