महाराष्ट्र

संगणक प्रमाणपत्र अभ्यासक्रमात आदिवासी विद्यार्थ्यांना सामाजिक दायित्व आले मदतीला

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.
भ्रमणध्वनी क्रमांक- 7030516640.

जव्हार तालुक्यात शिक्षणाच्या सुविधा या आश्रम शाळेतून योग्य प्रकारे मिळत असल्याचे अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या दैदिप्यमान शैक्षणिक प्रगतीतून दाखवून दिले आहे.यात राजकीय पुढारी, प्रशासकीय अधिकारी यांचा समावेश होत असून, राज्य शासनाच्या विद्यार्थी विकास या उपक्रमाला सामाजिक संस्थेच्या सामाजिक दायित्व प्रकल्पाचा देखील अनोखा हातभार लागत आहे. अश्यातच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार अंतर्गत दाभेरी येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा अंतर्गत यंदा इयत्ता बारावीचे १० तर एकूण २० आणि इतर १५ आदिवासी विद्यार्थ्यांना एमएस सी आय टी संगणक प्रशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम मोफत उपलब्ध करून दिल्याने या विद्यार्थ्यांना भावी आयुष्यात हे ज्ञान लाभदायक ठरणार आहे.

आदिवासी आणि अतिदुर्गम भागांत आरोग्य व्यवस्थेची वानवा,रोजगाराची गैरसोय, असे असताना दाभेरी येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेत एक सुसज्ज संगणक लॅब असून येथील विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण सोप्या व सुलभ भाषेत उपलब्ध होत आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी संगणक प्रशिक्षण घेतल्याने आधुनिक शिक्षणाचा पाया घट्ट होत आहे.

डॉर्फ केटल कंपनी व नवदृष्टी संस्था यांच्या संयुक्त उपक्रमातून शासकीय माध्य व उच्चमाध्य आश्रमशाळा, दाभेरी, शाळेत गेल्या पाच वर्षांपासून संगणक प्रशिक्षण सुरु आहे , कंपनीच्या मदतीने शाळेत प्रशस्त व अत्याधुनिक संगणक लॅब उभारली आहे, नवदृष्टी संस्था आदिवासी भागात गेल्या ९० च्या दशकापासून आरोग्य व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहे. डॉर्फ केटल व नवदृष्टी संस्थेमार्फत शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविले जातात. संगणक प्रशिक्षणाचा उपक्रम विद्यार्थ्यांना इयत्ता १२ वी नंतरची दिशा देणारा ठरणार आहे.

या उपक्रमासाठी सामाजिक उत्तरदायित्व (CSR) प्रमुख संतोष जगधने , नवदृष्टी संस्थेचे अध्यक्ष डॉ. टेकाळे तसेच एकात्मिक आदिवासी विकास विभाग, जव्हार आणि दाभेरी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक धीरज जामनिक , नवदृष्टी संस्थेचे प्रकल्प समन्वयक भूपेश कांबळे , संगणक शिक्षक कुणाल बल्लाळ व शाळेतील सर्व शिक्षकांचे व कर्मचाऱ्यांचे शैक्षणिक गुणवत्ता वाढीस नेहेमी हात भार लागत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button