महाराष्ट्र

पालघर केळवा सागरी पोलीस ठाणे हद्दीतील (17) वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक-7030516640

पालघर जिल्ह्यातील केळवा सागरी पोलीस ठाणे हद्दीतील (17) वर्षीय अल्पवयीन मुलगी गेल्या 3 दिवसापासून बेपत्ता झाली आहे.
याबाबत तिच्या आई-वडिलांनी केळवा सागरी पोलीस ठाण्यात शुक्रवारी मिसिंग तक्रार दाखल केली असून केळवा सागरी पोलीस तिचा शोध घेत आहेत.

सुष्मिता अनिल वळवी वय वर्ष (17) राहणार केळवा शितलाई देवीपाडा ही मुलगी पालघर दांडेकर कॉलेज येथे इयत्ता अकरावी मध्ये शिकत असून ती गेल्या वीस दिवसापासून तिची तब्येत बरी नसल्यामुळे कॉलेजला जात नव्हती शुक्रवार दिनांक 27 ऑक्टोबर 2023 रोजी तिचे आई-वडील बाहेर गेले असताना दुपारी बारा वाजता सुष्मिता वळवी ही मुलगी घरातून एका एक गायब झाली आहे. ती गेल्या तीन दिवसापासून घरी परत परतलीच नाही.

त्याबाबत तिच्या आई-वडिलांनी 27 ऑक्टोबर रोजी सागरी केळवा पोलीस ठाणे येथे मिसिंग तक्रार दाखल केली आहे. या मुली बाबत काही एक माहिती प्राप्त झाल्यास केळवा सागरी पोलीस ठाणे पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार यांच्याशी 79770 20479 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन केळवा सागरी पोलीस ठाणे यांच्याकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button