मुस्लिम समन्वय समितीच्या जिल्हा,तालुका व गाव पातळीवरील नुतन पदाधिकाऱ्यांचा सन्मान अकलूज येथे संपन्न

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
मुस्लिम समन्वय समितीचे प्रदेशाध्यक्ष रशिदभाई शेख यांच्या आदेशान्वये सोलापूर जिल्हा संघटक पदी रफिक पठाण यांची निवड नुकतीच करण्यात आली. तसेच माळशिरस तालुकाध्यक्ष सलिमभाई मुलाणी यांनी कोअर कमिटीच्या बैठकीनंतर पत्रक प्रसिद्ध करत तालुका संपर्क प्रमुख पदी रशिदभाई शेख व तांबवे अध्यक्ष पदी आमिर शेख यांची निवड केल्याने अकलूज येथे नुतन पदाधिकाऱ्यांचा आज सन्मान करण्यात आला.

सोलापूर जिल्ह्यासह माळशिरस तालुक्यातील मुस्लिम समाजातील सामाजिक,आर्थिक, राजकीय व शैक्षणिक मागासलेपण दूर करण्यासाठी समन्वय समिती कटिबद्ध असल्याची माहिती प्रवक्ता रियाज मुजावर यांनी दिली. विविध शासकीय योजना राबवून प्रशासकिय स्तरावरील दुवा म्हणून समन्वय समिती शोषित, पीडीतांचे प्रश्न मार्गी लावण्यास नक्कीच प्रयत्न करणार आहे. कामातून ओळख निर्माण झालेल्या समितीकडे गावखेड्यातून असंख्य मुस्लिम समाज बांधव जुडत आहेत. यावेळी नुतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करताना अॅड दादासाहेब पांढरे पाटील,नगरसेवक कैलास वामन, रियाजभाई मुजावर, अस्लम मुजावर, जिल्हा उपाध्यक्ष नौशादभाई मुलाणी,ग्रा.पं सदस्य रियाज शेख, तालुका संघटक अब्बास शेख, शाहबाज काझी , शाहनवाज काझी, कलिम फकीर आदी उपस्थित होते.








