शहर

पालघर केळवा माहीम 4 वाहनांच्या विचित्र अपघाता प्रकरणी सफाळे येथील इनोवा गाडीचे मालक ॲडव्होकेट संजय कुडू यांच्यावर सातपाटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक – 7030516640

पालघर जिल्ह्यातील सातपाटी पोलीस ठाणे हद्दीतील माहीम केळवा पानेरी जवळ शुक्रवारी संध्याकाळी 4 वाहनांचा विचित्र अपघात झाला असून या अपघातात 6 जण जबरी जखमी झाले आहेत.यापैकी दोन गुणांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथे रवाना करण्यात आले आहे. तर 4 जणांवर पालघर ढवळे हॉस्पिटल येथे उपचार सुरू असून या अपघातास कारणीभूत असलेल्या इनोवा क्रिस्टा गाडीचे सफाळे येथील मालक वकील संजय कुडू यांच्यावर सातपाटी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमनाथ ढोले यांनी शनिवारी संध्याकाळी गुन्हा दाखल केला आहे.

सफाळे येथील संजय कुडू हे पेशाने वकील असून शुक्रवार दिनांक 27 ऑक्टोबर 2023 रोजी संध्याकाळी 7.30 वाजण्याच्या दरम्यान पालघर येथून ते सफाळे दिशेने आपल्या घरी जात असताना केळवा माहीम पानेरी जवळ रस्त्यावर त्यांच्यापुढे चालणाऱ्या घोडा गाडीला त्यांनी पाठीमागून जबरी ठोकर दिल्यामुळे त्याच ठिकाणी त्याच रस्त्यावर दोन बाईक स्वार चालले असताना त्यांचा देखील या इनोवा गाडीमुळे अपघात झाल्यामुळे वनिता वसंत वय वर्ष (60), मनीषा विनोदी वय वर्ष (40 ), साक्षी विनोद किनी वय वर्ष (19 ), कौस्तुभ विनोदी किणी, प्रणव निलेश भोईर, शुभम निलेश गारडी वय वर्ष (16) हे सहा जण जबरी जखमी झाले असून यापैकी दोन जणांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथे दाखल करण्यात आले आहे.

तर अन्य 4 जणांना पालघर येथील ढवळे हॉस्पिटलमध्ये रवाना करण्यात आले आहे.
या विचित्र अपघातास कारणीभूत असलेले सफाळे येथील पेशाने वकील असलेले इनोवा गाडीचे मालक संजय कुडू यांच्यावर शनिवार दिनांक 28 ऑक्टोबर 2023 रोजी संध्याकाळी सातपाटी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमनाथ ढोले यांनी गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button