शैक्षणिक

सदाशिवराव माने विद्यालय, अकलूज येथे उत्साहात शाळा प्रवेशोत्सव संपन्न

Times 9 Marathi News Network

अकलूज, दि. १५ जून : नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी सदाशिवराव माने विद्यालय, अकलूज येथे शाळा प्रवेशोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. शाळेच्या प्रवेशद्वारावर आकर्षक रांगोळी काढून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. नवागत तसेच सर्व विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक अमोल फुले यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व मिठाई देऊन स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक प्रमुख दिग्विजय जाधव यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी आवश्यक विविध सूचना देण्यात आल्या. तसेच इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शालेय पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले.

याप्रसंगी बोलताना मुख्याध्यापक अमोल फुले सर यांनी विद्यालयाच्या गौरवशाली परंपरेचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, सहकार महर्षी यांनी लावलेला हा शिक्षणाचा वटवृक्ष आज भक्कमपणे उभा असून विद्यालयाच्या उज्ज्वल यशाची ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. या विद्यालयातील हजारो विद्यार्थी आज विविध क्षेत्रांमध्ये उच्च पदांवर कार्यरत असून संस्थेचे नाव उज्ज्वल करीत आहेत. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारी ही शाळा असून नूतन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांसाठी इंग्लिश स्पोकन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) हे नवीन विषय सुरू करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

या कार्यक्रमास उपमुख्याध्यापक दत्तात्रय घंटे, उपप्राचार्य संजय जाधव, पर्यवेक्षक राजेंद्र धोत्रे, सुजित कांबळे, शिक्षक प्रतिनिधी संजय राऊत, कल्पना मोरे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, बहुसंख्य पालक वर्ग उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या उत्साही सहभागामुळे शाळा परिसर आनंदमय वातावरणाने फुलून गेला असून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात उत्साह आणि सकारात्मक ऊर्जेने झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button