महाराष्ट्र

‘ई-नाम’ मुळे शेतमाल खरेदी-विक्री व्यवहारात पारदर्शकता येणार!


  • करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60

: केंद्र शासनाच्या नवीन धोरणानुसार ई-नाम (राष्ट्रीय कृषी बाजार) या नवीन प्रणालीमुळे शेतकऱ्यांचा अधिक फायदा होणार असून व्यवहारातील पारदर्शकता वाढणार असल्याचे प्रतिपादन भारत सरकार कृषी किसान विकास मंत्रालयाचे रंगनाथ कटरे यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात मत व्यक्त केले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे संचालक तथा करमाळा बाजार समितीचे सभापती माजी आमदार जयवंतराव जगताप होते .

केंद्र शासनाच्या नवीन धोरणानुसार ई-नाम (राष्ट्रीय कृषी बाजार) योजनेबाबत संबंधितांना माहिती मिळण्यासाठी ६ ऑगस्ट रोजी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयीन इमारतीच्या सभागृहात मार्गदर्शन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रणालीअंतर्गत करमाळा बाजार समितीचा समावेश झाला असून याबाबतचे मार्गदर्शन केंद्र शासन नियुक्त मार्गदर्शक रंगनाथ कटरे यांनी केले . याप्रसंगी उपसभापती शैलजा मेहेर, संचालक शंभूराजे जगताप,जनार्धन नलवडे, शिवाजी राखुंडे, मनोज पितळे, परेश दोशी, व्यापारी असो. अध्यक्ष विजय दोशी, व्यापारी अनिल सोळंकी, प्रितम लुंकड, विकी मंडलेचा, नवनाथ सोरटे, राजेंद्र चिवटे, उत्कर्ष गांधी, अनुप दोशी, कालिदास लोंढे, विपुल शहा, गिरीष दोशी,गोरख ढेरे,लोकेश लुणिया, यश माहुले आदी. तसेच वि.का.सेवा सोसायटी सचिव रविंद्र सपकाळ, अनिल सुरवसे,अमृत कटारिया,छगन पायघन व शेतकरी अनिल रासकर, संतोष कुकडे, संजय गायकवाड, प्रमोद गायकवाड, दादा शिंदे,दीपक उबाळे, नंदू नलवडे तसेच शेतकरी, व्यापारी, मापारी, शेतकरी वर्ग व कर्मचारी उपस्थित होते.

याप्रसंगी कटरे यांनी शेतमालास योग्य भाव मिळणे, शेतमालाचे वर्गीकरण (ग्रेडिंग), योग्य हाताळणी, मालाचे योग्य वजन व विक्री झालेल्या मालाचे या योजनेंतर्गत राज्यातील इतर बाजार समितीमध्ये नोंद असणाऱ्या खरेदीदार व्यापाऱ्यांना बोली लावणे शक्य होणार आहे. त्यामुळे स्पर्धा निर्माण होऊन चांगला दर मिळवता येणार आहे. भविष्यात शेतमालास गावांतील राष्ट्रीय स्तरावर देखील बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार असून शेतकऱ्यांना देय असणाऱ्या रकमाबाबत अधिक सुरक्षितता निर्माण होणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मिलिंद दोशी, तसेच आभार प्रदर्शन सचिव विठ्ठल क्षिरसागर यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button