पाचगणी ता. शिराळा राष्ट्रवादी गटाला खिंडार – भाजपा च्या झेंड्या खाली काम करण्याचा निर्धार

टाइम्स 9 मराठी न्यूज सांगली जिल्हा प्रतिनिधी : आनंद सावंत मो. 8007932121
पाचगणी मधील लोकनियुक्त नूतन सरपंच सौ. दीपाली संदीप पाटील व संदीप पाटील यांचा राष्ट्रवादी मधून भाजपा मध्ये पुर्नर प्रवेश…… भाजपा च्या झेंड्या खाली काम करण्याचा निर्धार…..
पाचगणी ता. शिराळा येथील युवा नेते संदीप पाटील व त्यांच्या पत्नी सौ.दिपाली पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस च्या नेत्यांनी फसवणूक करून राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करवून घेतला होता. आज मा. संदीप पाटील व सौ. दीपाली पाटील यांनी आम्ही भाजपा बरोबर असून आम्हाला फसविले असल्याचे सांगत लोकसभा निवडणूक प्रमुख मा.सत्यजीत देशमुख भाऊ व शिराळा विधानसभा निवडणूक प्रमुख मा. सम्राट बाबा महाडीक यांच्या उपस्थित दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस मधून भारतीय जनता पार्टीमध्ये पुर्नर प्रवेश केला. सौ.दिपाली पाटील यांचा पाचगणी ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक चालू असून गावातून सरपंच पदासाठी एकमेव अर्ज आहे. त्यामुळे त्या आता बिनविरोध लोकनियुक्त सरपंच निवडून येतील. या प्रसंगी त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी शिराळचे माजी नगरसेवक केदार भैय्या नलावडे, युवा नेते अनिकेत देशमुख, माजी जि.प सभापती जगन्नाथ माळी, संजय घोरपडे, रामभाऊ जाधव, हारूण शेख, सचिन दिवटे,



