पालघर केळवा सागरी पोलीस ठाणे हद्दीतील विधवा वयोवृद्ध महिलेचा गळ्यातील सोनसाखळी घेऊन मोटर सायकल स्वार भर दिवसा फरार

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640
पालघर जिल्ह्यातील केळवा सागरी पोलीस ठाण्याचे इन्चार्ज असलेल्या सहायक पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड यांच्या पोलीस ठाणे हद्दीतील आगरवाडी गावातील रस्त्यावर चालणाऱ्या एका विधवा वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील 1 लाख रुपयांची सोनसाखळी भर दिवसा एका अज्ञात मोटरसायकल स्वाराने खेचून घेऊन पलायन केले आहे.
ही घटना मंगळवारी सकाळी आगरवाडी रस्त्यावरील तलाठी कार्यालयाजवळ घडली आहे.
केळवा सागरी पोलीस ठाणे हद्दीतील आगरवाडी गावातील अल्का आत्माराम पाटील वय वर्ष 65 राहणार आगरवाडी ही वयोवृद्ध विधवा महिला मंगळवार दिनांक 24 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 8.45 वाजण्याच्या दरम्यान आगरवाडी रस्ता तलाठी कार्यालयाजवळ चालत असताना काळ्या रंगाच्या मोटरसायकलवर बसलेला अज्ञात इसम तिला पत्ता विचारण्याच्या उद्देशाने जवळ येऊन या महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांची एक लाख रुपये किंमत असलेली सोनसाखळी जबरदस्तीने खेचून घेऊन तो केळवा पालघर दिशेने फरार झाला आहे.
यावेळी या वयोवृद्ध विधवा महिलेची आणि अज्ञान बाईक स्वाराची झटपट झाली. या झालेल्या झटापटीमध्ये त्याचा मोबाईल या महिलेच्या हाती सापडला आहे.



