महाराष्ट्र

कर्तव्यदक्ष अधिकारी आयर्न मॅन किताब चे मानकरी तुषार चव्हाण यांचा बहुजन ब्रिगेड महासंघाच्या वतीने सन्मान.

प्रतिनिधी…रियाज मुलाणी मो 9921500780

पुणे येथील वनभवन कार्यालयास कार्यरत असलेले वन्यजीव उपवनसंरक्षक तुषार चव्हाण यांनी नुकताच एफ ,एस मधील पहिलाच आयर्न मॅन हा किताब पटकावला. सन २०१२ मध्ये यूपीएससीची परीक्षा देऊन त्यांनी सहावा क्रमांक पटकावला होता त्यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरचा शिक्षणा इतकीच खेळाची ही त्यांना लहानपणापासूनच गोडी होती महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर राहुरी विद्यापीठात अग्रिकल्चर इंजिनिअरिंग मध्ये बी टेक पूर्ण केले.

खेळाचे पोषक वातावरण मिळाले असल्याने नोकरी दरम्यान विविध खेळात सहभागी होणे त्यासाठी सराव करणे सुरू होते शालेय वयात त्यांनी खेळात अनेक बक्षीसही मिळवली आहेत. आपण क्रीडा क्षेत्रात काहीतरी करावे असे त्यांना वाटू लागल्याने त्यांनी आयर्न मॅन स्पर्धेत सहभाग घ्यावा यासाठी त्यांच्या पत्नीने ही त्यांना प्रेरणा दिली . सतिश ननवरे हे त्यांचे प्रशिक्षक होते कजाकिस्तान मध्ये झालेल्या आयर्न मॅन स्पर्धेत १८०किलोमीटर सायकल ४२ किलोमीटर धावणे आणि ४ किलोमीटर पोहणे सलग १५ तासात पूर्ण करून त्यांनी हा किताब पटकवला.

प्रदीर्घ मेहनतीचे फळ त्यांना लाभले असल्याने बहुजन ब्रिगेड महासंघाच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप मोहिते, उपाध्यक्ष गणेश साठे, जिल्हा उपाध्यक्ष नागेश ठोंबरे सह पदाअधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button