शहर

शिवरत्न सेमी इंग्लिश स्कुल मध्ये “विज्ञान दिन”साजरा.
विज्ञान शिकता शिकता जगता आलं पाहिजे’-माने देशमुख

उपसंपादक हुसेन मुलाणी

दिनांक २८ फेब्रुवारी
भौतिशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते चंद्रशेखर व्यंकट रमण यांचा जन्मदिवस ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. विज्ञान तंत्रज्ञान आज हाताशी आलंय, कधीकाळी विज्ञान म्हणजे खूप मोठं दिव्य ज्ञान असा समज होता पण आज माणूस विज्ञानाला खिशात घेऊन फिरतोय. विज्ञानाशी आपले आयुष्य जोडले आहे. पुरोगामी विचारांना मागे सारत विज्ञानाला सोबत घेऊन आपले आयुष्य विकासाच्या पथावर नेऊ शकतो. अज्ञान, अंधश्रद्धा, दारिद्रय, निरक्षरता यांच्यात अडकलेल्या भारतीय समाजाला विज्ञानाभिमुख करण्यासाठी व मानव कल्याणासाठी विज्ञान हे प्रभावीपणे लोकांपर्यंत पोचवायला हवे.

       या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेतील विज्ञान विषय शिक्षक . रणजित माने देशमुख  होते. 

           प्रारंभी   सी व्ही रमण यांच्या प्रतिमेचे पुजन उपस्थित मान्यवरांच्या  हस्ते  करुन आभिवादन  करण्यात आले  त्यानंतर विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रयोग प्रदर्शनाचे उद्घाटन अध्यक्षांच्या हस्ते करण्यात आले. बाल संशोधकानी तयार केलेले प्रयोग पाहून 'विज्ञानाच्या चष्म्यातून जग पाहू आणि देशाला प्रगतीच्या शिखरावर नेऊ' असाच त्यांनी आपल्या प्रयोगातून संदेश दिला असं वाटत होतं.

कार्यक्रमात पुढे विद्यार्थ्यांनी भाषणे केली विद्यार्थ्यांच्या भाषणानंतर प्रशालेचे मुख्याध्यापक जितेंद्र माने देशमुख सर यांनी विज्ञानातील गमती जमती या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधत अंधश्रद्धेच्या विषया वर 'विज्ञान' हा एक उत्तम उतारा आहे यावर दाखला दिला.

          तदनंतर प्रशालेतील शिक्षिका  मंदाकिनी गुंड यांनी विज्ञानातील सकारात्मक बदल सांगून विज्ञान दिनाचा इतिहास विद्यार्थ्यांसमोर मांडला. 

      जीवनाचे प्रयोग हे प्रयोगासारखे असतात आपण जिंकण्याच्या वेळेचा वापर करा, अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून सुरुवात करा यश तुमच्याच हातात आहे असा संदेश देत अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाची सांगता झाली.

          या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता सातवीतील विद्यार्थी  आदित्य संतोष वाघुले आणि  राजनंदिनी विनोद सावंत यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रशालेतील शिक्षक गणेश शेवकर यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button