ओंदे महाविद्यालयात ई-पीक पाहणी जनजागृती कार्यक्रम संपन्न

प्रतिनिधी राजेंद्र भोईर ….टाईम्स 9 मराठी न्यूज.. विक्रमगड
विक्रमगड (जि.पालघर ): विक्रमगड तालुक्यातील ओंदे येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात विक्रमगड तहसिल कार्यालय व महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ई-पीक पाहणी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रांत अधिकारी मा.रोहन कुंवर, विक्रमगड तालुक्याच्या तहसीलदार चारूशीला पवार, मंडळ अधिकारी नितीन माळगवी, तलाठी झुगरे व महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ.चेतना पाटील उपस्थित होत्या. यावेळी मा.रोहन कुंवर यांनी ई-पीक पाहणी अॕपचे महत्त्व सांगितले तर तहसीलदार चारूशीला पवार यांनी ई-पीक पाहणीची प्रणाली सांगितली.

विद्यार्थ्यांना व पालकांना ई-पीक पाहणी प्रणाली अॕपची पुर्णपणे माहिती व्हावी म्हणून नितीन माळगवी यांनी प्रत्यक्ष मोबाईलव्दारे ई-पीक पाहणी या अॕपवर शेतातील पिकांची कशी नोंदवावी, याबद्दल माहिती दिली. यावेळी विद्यार्थी , शिक्षकवर्ग, पालक मोठ्या संख्येने महाविद्यालयात उपस्थिती होते.




