महाराष्ट्र

काळमवाडी (ता.वाळवा) काळम्मादेवी जागर उत्सव(यात्रा)

सांगली प्रतिनिधी : आनंद सावंत मो.- 8007932121 टाइम्स 9 मराठी न्यूज

वाळवा तालुक्यातील काळमवाडी येथे असणाऱ्या काळम्मादेवी जागर (यात्रा) उद्या रविवार 22 ऑक्टोंबर 2023 रोजी आहे. येथील देवीचे देवस्थान जागृत असून देवी भक्तांच्या नवसाला पावते अशी लोकांची धारणा आहे. दसऱ्याच्या आधी असणाऱ्या श्री महालक्ष्मी जग्रा दिवशी ही यात्रा भरते, देवीचा महिमा संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्रा बाहेर सुद्धा पसरलेला असल्याने महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, गोवा, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, राजस्थान या राज्यांमधून भाविक भक्तगण दर्शनासाठी येत असतात.

यावेळी एका दिवसामध्ये जवळजवळ एक लाखापेक्षा जास्त भाविक भक्त दर्शनासाठी येऊन जातात. पहाटे 5 वाजल्या पासून रात्री 10 वाजेपर्यंत यात्रा असते. पहाटेची देवीची आरती झाल्या नंतर दर्शनाला सुरुवात होते. दुपारी 12 ची आरती झाल्यानंतर 12.30 ते 4 इंगळावरून चलनेचा कार्यक्रम असतो व 4 नंतर कुस्तीचे जंगी मैदान असते या वेळी हजारो भाविक व कुस्ती शोकिन मनोरंजनासाठी उपस्थित असतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button