संपादकीय

पोलीस एक खाकी वर्दीतील देवमाणूस- लेखक-महेश कोळेकर

टाइम्स नाईन मराठी न्यूज नेटवर्क मो ,97 30 867 448

पोलीस म्हंटल की, आपल्या डोळ्यासमोर येतो तो म्हणजे खाकी वर्दीतील एक देवमाणूस. होय बरोबर वाचलत तुम्ही देवमाणूसच. उन्ह, वारा,पाऊस अंगावर झेलून सदैव सामान्य जनतेच्या सेवेस तत्पर असतो तो म्हणजे पोलीस होय. तुम्हाला आठवतय का ज्यावेळेस विविध जयंती, मिरवणूका निघतात, मोर्चे निघतात, आंदोलन होतात, त्याला वेळेला हाच पोलीस बांधव आपल्या पाठीशी भक्कमपणे उभा असतो.

दिवसरात्र फक्त सामान्य जनतेच्या सेवेसाठी स्वतःची तहान भूक, घर परिवार विसरून सेवा करत असतो. ज्यावेळेस तुम्ही मिरवणुकीत, जयंतीमध्ये आनंदाने तुमचं सहकुटुंब घेऊन जल्लोष करीत असता. तो बिचारा पोलीस तुमच्या संरक्षणासाठी आपला जल्लोष, उत्साह, आनंद आपल्या मनातच दाबून. त्या पोलीस बांधवांना वाटत नसेल का आपणही आनंद व्यक्त करावा. आपण ही जल्लोष करावा. आपल्या कुटुंबाला वेळ द्यावा. तो अस काही न करता. आपलं कर्तव्य पार पाडतो. आपल्या कर्तव्यपोटी तो प्रामाणिक राहून जनतेची सेवा करतो.

कुठे आंदोलन झाली , दंगली पेटल्या तर तेथील नागरिकांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये म्हणून तो स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यात उतरतो आणि सर्व परिस्थिती हाताळतो. समाजात आणि आपल्या देशात कोणतेही वाईट अनुचित प्रकार घडू नयेत या दृष्टीने तो सतत सावधान राहतो. रात्री अपरात्री वेगवेगळ्या परिस्थिती ना सामोरे जातो. समाजातील कितीतरी वाईट प्रवृत्तीना तो दररोज तोंड देतो. अनेक जीवघेव्या संकटांचा तो रोज सामना करतो. सण,वार,उत्सव व्यवस्थित पार पडावेत म्हणून तो आपली संस्कृती आणि कर्तव्य या दोन्ही गोष्टी प्रामाणिकपणे पार पाडतो.

सामान्य जनतेला कोणत्याही गोष्टीपासून त्रास होऊ यासाठी तो सदैव कर्तव्यदक्ष राहतो. आपल्या विविध कार्याच्या माध्यमातून विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रम ही पोलीस बांधव राबवतात. देशात सदैव शांतता व सुव्यवस्था राहील याचीही ते खबरदारी घेत असतात. आज कित्येक ठिकाणी आपल्या पोलीस बांधवांनी मोठमोठ्या कामगिरी यशस्वीपणे पूर्ण केलेल्या आहेत. 26/11 चा हल्ला अजूनही आपण तो दिवस नाही विसरलेलो.

त्यामध्ये कित्येक पोलिसांनी आपले प्राण पणाला लावून त्या दहशतवादी सोबत लढले. आणि स्वतः शहीद झाले. कोरोना काळात प्रत्येकजण आपाआपल्या जिवाच्या रक्षणासाठी घरात बसत होते. पण हा पोलीस बांधव मात्र रस्त्यावर दिवसरात्र आपलं कर्तव्य बजावत होता. त्यांच्याही घरी कोणीतरी वाट पाहणार होत, त्यांना ही घर परिवार संसार, होता. तरीही त्यांनी आपल्या कर्तव्या पासून कधीही पाट फिरवली नाही. उलट जोमाने त्यांनी कार्य केले. कोरोना सारख्या भीषण महामारीच्या काळात सामान्य जनतेला आधार दिला.

अनेक सामाजिक गोष्टींची जनजागृती केली. सदैव सामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेतले. गुन्हेगारी क्षेत्राला आळा घालण्यासाठी सदैव विविध मार्गातून प्रयत्न केले. गुन्हेगार कमी व्हावेत, गुन्हे कमी व्हावेत, गुन्हेगारी प्रवृत्ती कमी व्हावी यासाठी वेळोवेळी ज्या त्या स्तरावर पोलीस बांधवांनी अनेक उपक्रम, अभियान, मोहीम प्रभावीपणे राबविल्या. प्रत्येक गोष्टींमध्ये पोलिसांचा सामान्य जनतेला आधार आहे. जसे की, कोठे चोरी झाली पोलीसांना बोलवा, कोठे खून झाला पोलिसांना बोलवा, कोठे दरोडा पडला पोलिसांना बोलवा, कोठे अनुचित प्रकार घडला लगेच पोलिसांना बोलवा अशा विविध समस्यांवर फक्त एकसाग उपाय तो म्हणजे फक्त आपला जिवाभावाचा पोलीस बांधव होय.

आज पोलीस प्रशासन मुळे देशात शांतता आणि सुव्यवस्था नांदत आहे. देशातील गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसत आहे. सामान्य जनतेने ही आपल्या पोलीस बांधवांना वेळोवेळी सहकार्य दाखवले आहे. सामान्य जनता आणि प्रशासन यामधील दुवा साधणारा देशात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करणारा पोलीस हा एक महत्वपूर्ण घटक म्हणून सामान्य जनतेच्या मनावर राज्य करीत आहे. अशा या पोलीस प्रशासनाला वर्दीतील देवमानसाला माझ्या सारख्या संवेदनशील लेखकाचा मानाचा जय हिंद। भारत माता की जय। वंदे मातरम।

लेखक- महेश बजरंग कोळेकर
रा- काक्रंबावाडी ता-तुळजापूर जि-धाराशिव.
संपर्क-9579228347.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button