भिवंडी परिसरातील रिक्षा दुचाकी चोरणाऱ्या अट्टल चोरट्यांना शांतीनगर पोलिसांनी अटक करून 3 लाख 70 हजार रुपयांची वाहने केली जप्त

टाईम्स 9 न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640
भिवंडी शहरातून रिक्षा आणि दुचाकी चोरी गुन्ह्यांचे वाढते प्रमाण या गंभीर बाबीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त भिवंडी यांनी वाहन चोरीवर आला घालण्यासाठी कारवाई करण्याचे आदेश जारी केली होते.
या आदेशांवर अंमलबजावणी करत शांतीनगर पोलिसांनी दोन तपास पथके तयार करून गुप्त माहितीच्या आधारे आरोपी इस्तियाक इकबाल अहमद अन्सारी (वय वर्ष 24 ) राहणार अहमदिया बरकतिया मस्जित भिवंडी याला ताब्यात घेऊन त्याची अधिक चौकशी केली असता त्यांनी भिवंडी कोळसेवाडी परिसरातून 2 रिक्षा व 6 दुचाकी चोरी केल्याचे कबुली दिली यावरून शांतीनगर पोलिसांनी या आरोपीच्या ताब्यातील 3 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदरची यशस्वी कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त विनायक देशमुख पश्चिम प्रादेशिक विभाग ठाणे शहर पोलीस आयुक्त, श्रीकांत परोपकारी परिमंडल दोन भिवंडी सहाय्यक पोलीस आयुक्त, सचिन सांगळे पूर्व विभाग भिवंडी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विनायक गायकवाड शांतीनगर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा, अतुल अडुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश चोपडे, पोलीस हवालदार संतोष मोरे, रिजवान सय्यद,श्रीकांत धायगुडे, दीपक सानप, रुपेश जाधव मनोज मुके प्रशांत बर्वे यांनी केली आहे.



