महाराष्ट्र

अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन…

आमीर मोहोळकर
टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499

अण्णाभाऊ साठे फक्त दीड दिवस शाळेत गेलेले “अवलिया” पुढे त्यांनी काय इतिहास केला हे आपल्या सर्वांना माहीतच आहे,केवळ “मातंग” म्हणून त्यांना शाळेतून हाकलले असताना याच भावनेतून जो उद्रेक झाला त्या भावनेने अवघा महाराष्ट्रच हादरवून सोडला…

सह्याद्रीच्या या शिलेदाराने सारा महाराष्ट्र घडविला तो आपल्या “विद्रोही” लेखणीने,अण्णाभाऊंची लेखणी हि शेवटच्या काळात सातासमुद्रा पलीकडे पोहचली,रशियाच्या एका भरगच्च गर्दीने भरलेल्या चौकात अण्णाभाऊ साठे यांनी आपले विचार व्यक्त केले…

“साहित्य रत्न” अण्णाभाऊ साठे यांनी मातंग समाजाच्या तळागाळातल्या माणसाला जगण्याचा “शब्द” दिला,”स्वाभिमान” दिला आणि लढण्याची “प्रेरणा” देखील दिली.त्यांच्या साहित्याची “मशाल” आजही समानतेसाठी प्रकाश देत आहे…

शोषितांच्या उत्थानासाठी आपले आयुष्य वाहणारे,साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांनी १३ लोकनाट्य,३ नाटके,१३ कथासंग्रह,३५ कादंबऱ्या,१ शाहीरी पुस्तक,१५ पोवाडे,१ प्रवास वर्णन,७ चित्रपट कथा असे महान साहित्य लिहून ठेवले…

अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून सामाजिक अन्यायाविरोधात आवाज उठवला.दलित समाजाच्या व्यथा,संघर्ष आणि आकांक्षा ज्या तळमळीने त्यांनी मांडल्या त्याला मराठी साहित्यात अढळ स्थान आहे.संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये त्यांनी बजावलेली भूमिका महाराष्ट्र कधीही विसरणार नाही…

शोषितांचा आक्रोश शब्दातून मांडणारे,अन्यायाविरुद्ध लेखणीला हत्यार बनवणारे थोर समाजसुधारक,लेखक,कवी,लोकशाहीर “साहित्य रत्न” अण्णाभाऊ साठे यांना त्यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त टाइम्स 9 न्यूज परिवारा तर्फे मानाचा मुजरा…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button