महाराष्ट्र

सोलापूर विद्यापीठाचा उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार जेऊर येथील भारत महाविद्यालयाचे मुख्य लिपिक श्री कैलास सातव यांना प्रदान

करमाळा प्रतिनिधी आलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार
जेऊरच्या भारत महाविद्यालयातील मुख्य लिपीक श्री. कैलास भागवत सातव यांना दि.०१ ऑगस्ट रोजी प्रदान करण्यात आला.

विद्याविठाच्या २० व्या वर्धापनदिनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.विजय फुलारी यांच्या शुभहस्ते व सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.प्रकाश महानवर , बालाजी अमाईन्सचे संचालक राम रेडडी , प्र.कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा तसेच कुलसचिव योगिनी घारे यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला.

याबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. आमदार नारायणआबा पाटील , उपाध्यक्ष राजूशेठ गादिया , सचिव अर्जुनराव सरकसर , प्राचार्य डाँ.अनंत शिंगाडे तसेच संकुलातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर वृंदानी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button