महाराष्ट्र

पालघर जिल्ह्यातील नागझरी येथील ज्वेलर्स मालकावर गोळीबार

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640.

पालघर जिल्ह्यातील नागझरी नाक्यावरील सोने चांदीचे दुकान बंद करून रात्रीच्या वेळेत ज्वेलर्स मालक आपल्या दुकानातील दागिने आपल्या घरी घेऊन जात असताना अज्ञात इसमांनी सराफावर बंदुकीतून तीन गोळ्या झाडल्या मात्र बंदूकधारी अज्ञात इसमाचा नेम चुकल्यामुळे या ज्वेलर्स मालकाचे प्राण वाचले आहेत.
सराफाने आरडाओरडा केल्यावर अंधाराचा फायदा घेत बंदूकधारी अज्ञात इसम पळून गेले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली आहे .
या घटनेचा तपास मनोर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू करण्यात आला आहे.

चार वर्षांपूर्वी नागझरी नाक्यावरील दुर्वांकुर ज्वेलर्सच्या दुकानात चोरी झाल्या कारणामुळे ज्वेलर्सचे मालक भाईदास कंडी वय वर्ष.47 दररोज त्यांचे दुकान बंद करून दुकानातील सोने चांदीचे दागिने घेऊन घरी जात होते.रविवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे दुचाकीवरून दुकानातील दागिने घेऊन नागझरी गावातील पवन विहार सोसायटीमधील जात होते. नागझरी नाका ते नागझरी गावा दरम्यानच्या जागेत दबा धरून बसलेल्या दोघांनी दागिने लुटण्याच्या उद्देशाने त्यांच्या दिशेने बंदुकीतून तीन गोळ्या झाडल्या परंतु प्रसंगावधान राखल्याने बंदुकीच्या गोळ्या भाईदास कंडी यांना लागल्या नाही.

या घटनेची माहिती मिळताच मनोर पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून घटनास्थळा वरून बंदुकीच्या गोळ्यांच्या दोन रिकाम्या पुंगळ्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.घटनास्थळा वरून पसार झालेल्या अज्ञात इसमांना पकडण्यासाठी चिल्हार बोईसर रस्त्यावर नाकाबंदी लावण्यात आली आहे.दरम्यान रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी घटनास्थळाला भेट देत मनोर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सतीश शिवरकर यांना तपासाबाबत सक्त आदेश दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button