पुनर्वसन कामांचे श्रेय माजी आमदार नारायण पाटील यांना जाईल या भितीपोटी कामात दिरंगाई – पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
पुनर्वसन कामाचे श्रेय माजी आमदार नारायण पाटील यांना जाईल या भीतीपोटी आमदार संजय शिंदे यांनी अधिकारी व ठेकेदार यांना कामांत दिरंगाई करण्यासाठी मोकळीक दिली असा थेट आरोप आज पाटील गटाकडून करण्यात आला. माजी आमदार नारायण पाटील यांनी पुनर्वसन कामासाठी 3 कोटी 22 लाख रुपये मंजूर झाला अशी माहिती काल दिली. आज पुनर्वसन प्रश्नावर पाटील गटाने परत आक्रमक भूमिका घेतली आहे.
यावर सविस्तर बोलताना पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी सांगितले की उजनी धरणाच्या निर्मिती साठी करमाळा तालुक्यातील 30 गावांनी त्याग केला व आपल्या चांगल्या जमिनी, घरे, वडे, शेती, गाव व मंदिरे पाण्याखाली घातली. धरणाची निर्मिती होऊन पाच दशके उलटून गेली परंतु या पुनर्वसित गावांना न्याय मिळवून देण्यासाठी कोणी शासन दरबारी आवाज उठवला नाही. सन 2014 मध्ये नारायण पाटील यांनी आमदार झाल्याबरोबर पहिल्याच अधिवेशनात हा प्रश्न सभागृहात मांडला. अर्थसंकलपीय अधिवेशनात या कामासाठी 21 कोटी रुपयांची निधीची मागणी केली.
मंत्रालयीन पातळीवर तसे जिल्हाधकाऱ्यां बरोबर नियोजन व आढावा बैठक घेण्यास भाग पाडले. पुनर्वसन विभागाकडून सदर कामांचे प्रस्ताव तयार करून घेतले.सततच्या अधिवेशनात हा प्रश्न अनेकदा मांडला. आमदार म्हणून तारांकित प्रश्न, लक्षवेधी सूचना, अर्ध्या तासाची चर्चा या अधिकारांचा वापर केला.यानंतर कुठे या सर्व कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली.
21 कोटी रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आला तरी यास निधी मिळवून देण्यासाठी प्रत्येक अर्थसंकल्पा मध्ये मागणी करून पाठपुरावा केला.
पुरवणी मागण्या केल्या व यास निधी मंजूर करून घेतला. यानंतर कुठे अनेक वर्ष रखडलेला पुनर्वसन सुविधेचा प्रश्न मार्गी लागला.या कामामध्ये पुनर्वसित गावांना अठरा मूलभूत नागरी सुविधा मिळतील अशा कामांचा समावेश आहे.यानंतर कामांना सुरुवात झाली पण सन 2019 नंतर या कामांना ब्रेक लागला.ही कामे वेळेत पूर्ण झाली तर याचे श्रेय माजी आमदार नारायण पाटील यांना जाईल म्हणून विद्यमान आमदार संजय शिंदे यांनी या कामाकडे दुर्लक्ष केले. पुनर्वसन विभागाची कधी बैठक घेतली नाही. जी कामे मंजूर झाली होती तेथे सबंधित ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अधिकारी व ठेकेदारांना हजारो फोन करून ही कामे सुरू करण्यास भाग पाडले.पण तरीही अनेक ठिकाणची कामे झालीच नाहीत. तर या कामांच्या दर्जाबाबत आमदारांनी संबधित ठेकेदारांना कधी धारेवर धरले नाही.
यामुळे मग आमदार म्हणून आ संजय शिंदे यांनी वेळीच अधिकारी व ठेकेदार यांची बैठक घेतली असती आणि तातडीने आणि दर्जेदार कामे क्रा अशा सूचना दिल्या असत्या तर आज वेळेत सर्व कामे पूर्ण झाली असती. पुनर्वसित गावांना वेठीस धरण्याचे काम यातून केले गेले असल्याचा थेट आरोप तळेकर यांनी केला.



