संपादकीय

मोहिते पाटील घराण्याची सामाजिक राजकीय वैचारिक पायाभरणी मजबूत
विरोधकांच्या वावड्या गोते खाताना

बी.टी.शिवशरण

अकलूजच्या मोहितेपाटील घराण्याने केवळ सत्तेसाठी राजकारण हे न पहाता माळशिरस तालुक्यात स्वातंत्र्यपूर्व काळापासून जनसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद घेऊन सामाजिक विकासाचा मजबूत पाया घातला त्यामुळे त्यांना केवळ नावलौकिक च मिळाला असे नाही तर जनाधार मिळाला आहे तो आजपर्यँत कायम टिकून आहे त्यांनी सत्तेसाठी राजकारण केले नाही तर सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांनी हातात कोणतीही मोठी सत्ता नसताना माळशिरस तालुक्याचा जो न भूतो न भविष्यती कायापालट करुन दाखवला ही बाब आता नमूद का करावी लागते तर त्या काळात अतिशय बिकट प्रतिकूल परिस्थिती वातावरण कठीण असतानाही केवळ लोकहीत समाजहीत परिसराचा कायापालट करायचाच लोकांना सुखी समाधानी पहायचेच हा ध्यास घेऊन विकासाचे स्वप्न प्रत्यक्षात साकारणारे मोहितेपाटील हे माळशिरस तालुक्याचे विकासपुरुष ठरतात

हल्ली वाचाळ व बोलबच्चन लोक आपल्या बोलघेवढ्या स्वभावामुळे आमदार खासदार राज्यमंत्री मंत्री होतात पण सत्ता गेली कीं त्यांना त्यांच्या परिवाराशिवाय पुन्हा कोणी विचारत ही नाही पण मोहितेपाटील घराण्याने सहकार समृद्ध केला संस्था उभ्या केल्या हजारो हातांना काम दिले महात्मा गांधी यांनी जो संदेश दिला होता खेड्या कडे चला खेडी समृद्ध झाली परिपूर्ण झाली तरच भारत मोठा होईल प्रगती करेल त्या उक्तीप्रमाणे पूर्वी उजाड ओसाड माळ असलेल्या माळशिरस तालुक्याचे नंदनवणं करुन येथील गाव शहर खेडी सुजलाम सुफलाम केली

त्या काळात सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांना जर मंत्री पद घ्यायचेच असते तर ते अशक्य मुळीच नव्हते पण माळशिरस तालुक्याचा विकास करुन येथील जनतेला सुखीसमाधानी करायच्या ध्येयाने वाटचाल करुन सतत नवनवीन योजना प्रकल्प उभारणी करण्याचा ध्यास असलेल्या सहकार महर्षीनी पद सत्ता गौण मानली त्याशिवाय आज आपण पहात असलेले हे विकासाचे वैभव दिसलें नसते त्या काळात पाणी वीज आणून केवळ शेती सहकार मोठा केला नाही तर शिक्षण कृषी उद्योग वाढवत संस्कृती जोपसण्यासाठी लोककला पारंपरिक खेळ जोपासले वाढवले त्यात कुस्ती लेझीम आट्या पाट्या हुतु तू या बरोबरच अनेक मर्दानी खेळ कला यांना उत्तेजन पाठिंबा दिला ही आता पुन्हा नव्याने उजळणी करण्याचा उद्देश किंवा हेतू एवढाच आहे कीं ज्या अकलूज च्या शिवरत्न गडावरून सोलापूर जिल्ह्याचे राजकारण समाजकारण चालत अकलूजच्या राजकीय तालमीत येऊन ज्यांनी जिल्ह्यातील सहकारी संस्था स्वराज्य संस्था यामध्ये पद मिळवली

चेअरमन आमदार खासदार सभापती उपसभापती झेडपी पंचायत समिती सदस्य ही सत्तेची पद मिळवली ते आज खोबरं तिकडं चांग भलं या उक्ती प्रमाणे भरकटताना दिसतात ज्यांना गावात एखादी संस्था उभी करता आली नाही चालवता आली नाही ते तालुक्यात जिल्ह्यात आव्हान देऊन शड्डू ठोकतात हे हास्यस्पद आहे ज्यांनी रस्ते बांधले त्या रस्त्यावरून चालायचे ज्यांनी पाणी आणले ते प्यायचे ज्यांनी झाड लावले त्या सावलीत बसायचे ज्यांनी उद्योग निर्मिती केली नावारूपाला आणले व्यापार वाढला


झांली त्या मूळ विकासपुरुष असलेल्या सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील या दूरदृष्टी असलेल्या नेत्याने असामान्य कर्तृत्व नेतृत्व केले त्यांच्याकडे वक्तृत्व कर्तृत्व नेतृत्व यांचा त्रिवेणी मिलाफ होता त्यामुळेच ते विकास करू शकले प्रगती करू शकले आज त्यांच्या पश्च्यात चौथी पिढी समाजकारण राजकारण विकास यामध्ये अग्रेसर आहे सत्ता येते जाते पण सत्ता नसताना जो मान सन्मान रुबाब दरारा आहे जनाधार आहे तो फक्त मोहिते पाटील यांनाच अकलूज प्याटर्न अकलूज चे नाव अनेक कारणांनी गाजतांना वाजताना पहायला मिळते सत्तेसाठी राजकारण न करता त्यांनी विकासाचा पाया भक्कम केलात्यांनी साठ टक्के समाजकारण व चाळीस टक्के राजकारण केले असे म्हटले तर वावगे होणार नाही हल्ली समाजकारण राजकारण याची व्याख्या बदलली आहे

सत्तेच्या साठमारीत अनेक वादळे येतात जातात सत्ता जाताच ते पुन्हा कुठल्या अडगळीत जाऊन पडतात हे समजत ही नाही हल्ली तर आमदारकी मिळवण्यासाठी मागासवर्गीय जात चोरणारे या तालुक्यात निपजले आहेत ही शोकांतिका आहे बाप हा बाप असतो हे कोणाला सांगावे लागत नाही इतिहास विसरता कामा नये येणाऱ्या पिढीला माहित असावे ज्ञात व्हावे समाजकारण काय असते विकास काय असतो राजकारण करताना समाजहीत लोकहीत कसे जपले जावे हे मोहिते पाटील घराणे आदर्श ठरावेत

त्यांची स्तुती गुणगान करण्याचा हेतू नाही पण हल्ली राजकारण कोणत्या थराला जात आहे चालले आहे हे पहिले तर माळशिरस तालुकाच नव्हे तर राज्याच्या राजकारणात राजकीय सामाजिक सभ्यता सुसंकृत वाटचाल कशी असावी कोणाला कसा मान द्यावा कोणाकडून सन्मान स्वीकारावा याच बाळकडू मोहिते पाटील यांना चांगलेच अवगत आहे शंकरराव मोहिते पाटील हे अल्प शिक्षित होते पण अनुभव व्यासंग अभ्यास वक्तृत्व यामुळे यांनी महाराष्ट्रात अनेक मोठी महत्वाची जबाबदारीची पद भूषवली ते ज्या पदावर विराजमान असायचेत्याला त्यांनी मोठे केले वैभव निर्माण केले अनेक आठवणी घटना प्रसंग सांगता येतील सध्याच्या गढूळ व बेचव झालेल्या राजकारणात ही आठवण लिहावी वाटली त्याच प्रमाणे नवीन पिढीला पूर्वी समाजकारण राजकारण विकास कसा होता व आता केवळ शाब्दिक मुद्दे गुद्दे आरोप प्रत्यरोप शिवीगाळ वस्त्रहरण चरित्र्यहरण यामुळे राजकारण बदनाम झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button