कुणबी सेनेचा धक्कादायक निर्णय….बहुजन विकास आघाडीसोबत राजकीय मैदानात
टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक 7030516640
नालासोपारा वसई आणि बोईसरच्या निवडणुकीत राजकीय खळबळ माजवणारा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या सात वर्षांपासून भाजपसोबत असलेल्या कुणबी सेनेने आता अचानक बहुजन विकास आघाडीला साथ देण्याची घोषणा केली आहे. कुणबी सेनेचे नेते विश्वनाथ पाटील यांनी बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांची भेट घेऊन पाठिंब्याचे पत्र सुपूर्द केले आहे.
पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, “भाजपसोबत सात वर्षे राहूनही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अपेक्षित परिणाम झाला नाही.” त्यामुळे नाराजी व्यक्त करत त्यांनी आघाडीबरोबर निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला. स्थानिकांच्या हितासाठी एकत्र येण्याचे ध्येय उराशी बाळगत कुणबी सेनेने बहुजन विकास आघाडीसोबत हातमिळवणी केली आहे.या पुढेही सोबतच राहणार अस कुणबी सेना अध्यक्ष विश्वनाथ पाटील यांनी सांगितले.
या बदललेल्या समीकरणामुळे आगामी निवडणुकीत नवा रंग भरला जाणार आहे.