सफाळे दातीवरे इंग्लिश हायस्कूल येथे शिक्षण सप्ताह दरम्यान विविध शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640
पालघर जिल्ह्यातील दातीवरे इंग्लिश हायस्कूल येथे केंद्र सरकारच्या निर्देशानुसार 22 ते 28 जुलै 2024 या दरम्यान विविध शैक्षणिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यानुसार आठवडा भर विविध उपक्रम राबवून शिक्षण सप्ताह साजरा करण्यात आला. या सप्ताहाचा शेवटच्या दिवशी या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दातीवरे शिक्षण संस्थेचे सहसचिव आणि मित्र फाऊडेशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट निलेश राऊत यांच्यासह मित्र फाऊंडेशनचे विभागीय उपाध्यक्ष प्रथमेश बांदेकर उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षणा बरोबरच विविध प्रकारच्या उपक्रमात सहभागी झाले पाहिजेत.त्यामुळे आपल्या ज्ञानात मोलाची भर पडते.असे प्रतिपादन ॲडव्होकेट निलेश राऊत यांनी केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक सुजय वसावे ज्येष्ठ शिक्षिका सौ.मनीषा कुलकर्णी,सह शिक्षिका सौ.प्रीतम राऊत, रुपेश राऊत, संजय भोपी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेतील सहशिक्षक सुशील ठाकूर यांनी केले.यावेळी शिक्षक पालक समिती सदस्य,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



