शाहीन फाऊंडेशन ने जाहीर केला 28 जाने “24 रविवार या दिवशी 2 रा सामुदायिक विवाह सोहळा…

प्रतिनिधी आमीर मोहळकर
गेल्या वर्षी सोलापूर शहरातील अनेक युवक एकत्र येत आपण समाजाचे काही तरी देणं लागतो या उदात्त भावनेने स्थापन केलेल्या “शाहीन फाऊंडेशन” ने 26 जाने 2022 रोजी न भूतो न भविष्यती असा मोफत सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला होता,या विवाह सोहळ्यात जवळ जवळ 30 ते 35 जोडप्यांची लग्न लावून प्रत्येक वधू वरासाठी संसार उपयोगी वस्तू भेट देण्यात आल्या होत्या,या विवाह सोहळ्याची चर्चा अवघ्या महाराष्ट्रात झाली होती…
गेल्याच आठवड्यात शाहीन फाऊंडेशन ची वार्षिक सभा सोलापूर येथे घेण्यात आली त्या वेळी बोलताना अध्यक्ष मा. हाजी उमर (M राऊंड) यांनी 28 जाने “24 रविवार या दिवशी संस्थेचा 2 रा सामुदायिक विवाह सोहळा संपन्न होणार आहे असे जाहीर केले आणि सदर विवाह सोहळ्याचा समाजातील प्रत्येक घटकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले,यावेळी शाहीन फाऊंडेशन चे सन्माननिय सर्व सदस्य आणि बहुसंख्य समाज बांधव उपस्थित होते…
सदर विवाह सोहळ्यात नाव नोदणी साठी समीर तांबोळी 9403874342,इब्राहीम शेख 9766105355 या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा अशी माहिती टाइम्स 9 मराठी प्रतिनिधी आमीर मोहोळकर यांच्याशी बोलताना दिली…



